सुभाष चौक रस्त्यावर हॉकर्सचा ठिय्या पुन्हा अतिक्रमणाचा प्रयत्न : बी.जे.मार्केटला व्यवसाय होत नसल्याचे गार्हाणे
By admin | Published: May 31, 2016 1:54 AM
जळगाव : मनपाने सुभाष चौक रस्त्यावरून न्यू बी.जे. मार्केटच्या आवारात स्थलांतरीत केलेल्या हॉकर्सपैकी ३०-४० हॉकर्सनी सोमवारी दुपारी सुभाष चौक रस्त्यावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. मात्र मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने त्यांना रोखले. त्यामुळे चिडलेल्या हॉकर्सनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले.
जळगाव : मनपाने सुभाष चौक रस्त्यावरून न्यू बी.जे. मार्केटच्या आवारात स्थलांतरीत केलेल्या हॉकर्सपैकी ३०-४० हॉकर्सनी सोमवारी दुपारी सुभाष चौक रस्त्यावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. मात्र मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने त्यांना रोखले. त्यामुळे चिडलेल्या हॉकर्सनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले. मनपाने सुभाष चौकातील हॉकर्सचे न्यू बी.जे. मार्केटच्या आवारात स्थलांतर केले आहे. मात्र बळीरामपेठेतील हॉकर्सचे स्थलांतर न केल्याने ग्राहक अद्यापही याच परिसरात येतात. त्यामुळे न्यू बी.जे. मार्केटला व्यवसाय चालत नसल्याची या हॉकर्सची तक्रार आहे. आयुक्तांनी स्थलांतर करतानाच १ महिना नवीन जागेवर व्यवसाय करून बघा. व्यवसाय चालला नाही, तर पुन्हा जुन्या जागेवर व्यवस्था करून देऊ, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता आयुक्तांनाच येथे चर्चेसाठी बोलवा अशी भूमिका हॉकर्सनी घेतली. मनपाने तातडीने पोलिसांनाही पाचारण केले. त्यामुळे अतिक्रमण रोखण्यात आले. मात्र ठिय्या आंदोलन सुरू होते. -----दुभाजकाचे काम करणार्यांना पिटाळलेसुभाष चौकात नवीन दुभाजकाचे काम करण्यासाठी आधीचा जुना दुभाजक तोडण्याचे काम सध्या सुरू आहे. त्या कामगारांना या हॉकर्सनी पिटाळून लावल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली.-------अतिक्रमणची हप्ते वसुली जोरातमनपाच्या अतिक्रमण विभागाची हप्ते वसुली जोरात सुरू आहे. मोजे विक्रेत्यांच्या ३० गाड्या आहेत. त्या प्रत्येकाकडून ५ ते १०हजार रुपये हप्ता वसुली करण्यात येत आहे. तर शहरात ठिकठिकाणी १५ ते २० टरबूज विक्रेते असून त्यांच्याकडून ३ ते ५ हजारांच्या आसपास वसुली घेतली जात आहे. होर्डीर्ंगची मुदत संपल्यावरही ते तातडीने न काढता त्याची वसुली खिशात टाकली जात आहे. माठ विक्रेत्यांकडूनही ५ हजारांची वसुली करण्यात आली असल्याचे समजते. याखेरीज अतिक्रमण काढलेल्या सुभाष चौक रस्ता व शिवाजी रस्त्याच्या लगतच्या बोळींमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. त्यासाठी प्रत्येक गाडीचालकाकडून ५० ते १०० रुपये वसुली केली जात आहे.