शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?
2
भयंकर! जमीन हडपण्यासाठी स्वतःवर झाडली गोळी; पोलिसांच्या मदतीने रचला फिल्मी कट, अखेर...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: अनियंत्रित रागाला लगाम घाला, आर्थिक चणचण भासेल
4
म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; ट्रेनच्या डब्यांनी घेतला पेट
5
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यास जरांगेंचे आव्हान; भगवान भक्तिगडावर मुंडे; नारायणगडावर पाटील
6
युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी
7
टाटा ट्रस्टची धुरा नोएल टाटांकडे; उत्तराधिकारी निवडला, ‘टाटा ट्रस्ट्स’च्या चेअरमनपदी निवड
8
उड्डाणानंतर विमानात बिघाड, काही तास घिरट्या, सुखरूप लॅंडिंग; पायलटमुळे प्रवाशांचे प्राण वाचले
9
सीमेपलीकडून १५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; सुरक्षा दलांना अधिक सतर्कतेचा इशारा
10
फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत
11
निवडणुकीच्या तोंडावर ‘सोशल इंजिनीअरिंग’; विविध समाजांसाठी महामंडळे स्थापन करण्याचा सपाटा
12
‘लाडक्या’ योजना हव्या, तर मत द्या; विकासासाठी पुन्हा महायुती सरकार आणावे लागेल: CM शिंदे
13
राजेगटाचं ठरलं! बंधू संजीवराजे ‘तुतारी’ घेणार; रामराजे महायुतीचा प्रचार करणार नाहीत
14
“राजकारणात बजबजपुरी, आता कोण कुठे असेल काही सांगता येत नाही”: संभाजीराजे
15
“हरयाणात जे घडले ते महाराष्ट्रात कदापि घडणार नाही, कारण...”: प्रणिती शिंदे
16
रिपाइंला ८ ते १० जागा हव्यात; निवडणूक आमच्याच चिन्हावर लढणार: रामदास आठवले
17
भाजप नेते अजित पवार यांना साइड ट्रॅक करताहेत; विजय वडेट्टीवार यांचा आरोप
18
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
19
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
20
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान

हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचा ताफा रोखल्याप्रकरणी १३ शेतकऱ्यांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा

By मोरेश्वर येरम | Published: December 24, 2020 11:00 AM

अंबालाच्या अग्रसेन चौकात मुख्यमंत्र्यांचा ताफा येताच काही शेतकऱ्यांनी काळे झेंडे फडकवले होते.

ठळक मुद्देमुख्यमंत्री खट्टर यांच्या ताफ्याला शेतकऱ्यांनी दाखवले होते काळे झेंडेशेतकऱ्यांवर गुन्हा दाखल केल्याप्रकरणी काँग्रेस आक्रमकभाजप सरकारकडून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप

नवी दिल्लीनव्या कृषी कायद्यांच्याविरोधात हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासमोर निषेध व्यक्त करण्यासाठी त्याचा ताफा रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या १३ शेतकऱ्यांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा आणि दंगलीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

हरियाणा सरकारच्या या कृत्यावर काँग्रेसने कडाडून टीका केली आहे. शेतकऱ्यांसंबंधी सरकार कसं निष्ठूर आहे हे या कारवाईमधून कळतं, असं काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा कुमारी सेजला म्हणाल्या. हरियाणाच्या अंबालामध्ये मंगळवारी शेतकऱ्यांच्या एका गटानं मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले होते.

आगामी पालिका निवडणुकांसाठी पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ सभांना संबोधित करण्यासाठी मुख्यमंत्री खट्टर अंबालामध्ये आले होते. अंबालाच्या अग्रसेन चौकात मुख्यमंत्र्यांचा ताफा येताच काही शेतकऱ्यांनी काळे झेंडे फडकवले होते. याशिवाय, सरकारविरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांच्या माहितीनुसार, काही शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न केला आणि काही काळासाठी गोंधळ निर्माण झाला होता. त्यातील काही जणांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांवर लाठ्या फेकल्याचंही पोलिसांनी सांगितलं. 

"शेतकऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करुन हरियाणा सरकारने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. शेतकऱ्यांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करणारं सरकार किती निराशेच्या गर्तेत बुडालंय हे दिसून येतं", असं कुमारी सेजला म्हणाल्या. भाजप सरकारकडून वारंवार शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. "भाजप सरकारवरने जनतेचा विश्वास गमावला आहे. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजप सरकारकडून झाला आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांकडून मुख्यमंत्री खट्टर यांना काळे झेंडे दाखवले जात आहेत", अशी टीका कुमारी सेजला यांनी केली.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपHaryanaहरयाणा