राजौरी: जम्मू-काश्मीरमधील बारामुल्लाच्या उरी सेक्टरमध्ये सीमा ओलांडणाऱ्या 3 दहशतवाद्यांचा भारतीय सैन्याने खात्मा केला आहे. घुसखोरांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, लष्कराच्या जवानांना नियंत्रण रेषेजवळ (LOC) संशयास्पद हालचाली आढळून आल्याने जवानांनी गोळीबार केला.
एक पळून जाण्यात यशस्वीपीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, अधिकाऱ्यांनी माहिती दिली की एकूण चार घुसखोर होते, त्यापैकी तीन मारले गेले, चौथा दहशतवादी पळून गेला. खराब हवामान आणि धुक्यामुळे चौथ्या दहशतवाद्याचा शोध लागू शकला नाही. त्याचा शोध सुरू आहे सैन्याचे पथक करत आहे. विशेष म्हणे, गेल्या पाच दिवसांत घुसखोरीचा हा तिसरा प्रयत्न आहे. या पाच दिवसांत 5 दहशतवादीही मारले गेले आहेत.
बांदीपोरात दोन दहशतवादी अटकआज सकाळी बांदीपोरा पोलिसांनी 26 आसाम रायफल्ससोबत केलेल्या संयुक्त कारवाईत लष्कराच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. यात मॅगझिनसह 3 पिस्तूल, 24 जिवंत 9MM काडतुसे, 5 हातबॉम्ब, बनावट पोलिस ओळखपत्र, आरोग्य विभागाची बनावट ओळखपत्रे यांचा समावेश आहे.
नौशेरात 2 दहशतवादी मारले गेलेयाआधी 22-23 ऑगस्ट रोजी दुसऱ्या एका ऑपरेशनमध्ये 3 दहशतवाद्यांनी नौशेराच्या लाम सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला होता. जवान त्यांच्यावर लक्ष ठेवून होते, एलओसी ओलांडून माईन्स झोनमध्ये येताच लँड माईन्स अॅक्टीव्ह झाल्या. यावेळी झालेल्या स्फोटात दोन दहशतवादी जागीच ठार झाले. एक दहशतवादी जखमी झाला, मात्र खराब हवामानाचा फायदा घेत तो पळून गेला. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 ऑगस्ट रोजी सापडले.