नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत नेहमीपेक्षा वेगळ््या (अनयुझ्वल) हालचालींची नोंद झाल्याबद्दल सरकारने बुधवारी गंभीर चिंता व्यक्त करून रेल्वेमार्गांना घातपात करणे आणि स्फोट घडवून आणण्याचे प्रयत्न झाले, असा आरोप केला. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी लोकसभेत अनेक पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना म्हटले की स्फोट घडवण्याचे सात प्रयत्न झाले व घातपाताच्या तीन घटना घडल्या. राष्ट्रीय तपासणी यंत्रणा (एनआयए) उत्तर प्रदेशातील कानपूरनजीक रेल्वे रुळांवरून घसरण्याशी संबंधित घटनेची चौकशी सध्या करीत आहे. गेल्या काही दिवसांत नेहमीपेक्षा वेगळ््या घटना समोर आल्या असून रेल्वे कर्मचाऱ्यांच्या दक्षतेमुळे काही दुर्घटना टळल्या, असे प्रभू यांनी प्रश्नोत्तर तासात सांगितले.रेल्वे रुळांवरून घसरण्याच्या ताज्या घटनांनंतर जपान, दक्षिण कोरिया आणि इटालीने त्यांच्या तुकड्या पाठवल्या होत्या व त्याचे श्रेय पंतप्रधानांच्या मुत्सद्देगिरीच्या कौशल्याला आहे, असे प्रभू म्हणाले. रेल्वे सध्या रेल्वेमार्गाला कुठे तडा गेला आहे का आणि तसे असल्यास दुर्घटना टाळण्यासाठी त्याची आधीच सूचना मिळावी म्हणून अत्याधुनिक अल्ट्रासोनिक तंत्रज्ञान वापरण्याच्या प्रक्रियेत आहे. या तंत्रज्ञानाशिवाय रेल्वे संरक्षण दलाला फोरेन्सिक स्ट्रटेजी विकसित करण्यास सांगितले आहे, असे सुरेश प्रभू यांनी लेखी उत्तरात सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)प्रभू यांनी दिलेल्या माहितीनुसार २००६-२००७ मध्ये १९५ तर २०१४-२०१५ मध्ये १३५ रेल्वे अपघात झाले होते. २०१५-२०१६ मध्ये १०७ झाले. दर दशलक्ष रेल्वे किलोमीटरला किती अपघात होतात हे हा प्रवास किती सुरक्षित आहे हे ठरवण्याचा महत्वाचा निर्देशांक असतो.हे अपघात २००६-२००७ मध्ये ०.२३ पासून २०१४-२०१५ मध्ये ०.११ आणि २०१५-२०१६ मध्ये ०.१० पर्यंत आले.
रेल्वेमार्गांवर घातपाताचे प्रयत्न झाले : सुरेश प्रभू
By admin | Published: February 09, 2017 2:08 AM