केरळमध्ये प्रियंका गांधी यांचा ताफा रोखण्याचा केला प्रयत्न, युट्युबर अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 10:35 IST2025-04-01T10:34:45+5:302025-04-01T10:35:10+5:30
Priyanka Gandhi News: काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचा ताफा रोखण्याच्या आरोपाखाली एका यूट्यूबरला गजाआड केली आहे. या घटनेच्या संदर्भात मन्नुथी पोलिसांनी एलानाडू येथील रहिवासी अनीश अब्राहम याला ताब्यात घेतले

केरळमध्ये प्रियंका गांधी यांचा ताफा रोखण्याचा केला प्रयत्न, युट्युबर अटकेत
त्रिशूर (केरळ) - काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचा ताफा रोखण्याच्या आरोपाखाली एका यूट्यूबरला गजाआड केली आहे. या घटनेच्या संदर्भात मन्नुथी पोलिसांनी एलानाडू येथील रहिवासी अनीश अब्राहम याला ताब्यात घेतले व नंतर त्याला जामिनावर सोडले आहे. त्याची कार जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले की, ही घटना शनिवारी रात्री ९:३० वाजता मन्नुथी बायपास जंक्शनवर घडली. प्रियंका गांधी त्यावेळी त्यांचा मतदारसंघ व मलप्पुरम जिल्ह्यातील अनेक कार्यक्रमांत सहभागी झाल्यानंतर वंदूर, मलप्पुरमहून कोची विमानतळाकडे जात होत्या.
गुन्हा दाखल
मन्नुथीच्या उपनिरीक्षकांच्या नेतृत्वातील पोलिस पथकाने त्याला तेथून हटविण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने भांडण करण्याचा प्रयत्न केला.
यूट्यूबरच्या विरोधात हेतूपुरस्सरपणे ताफ्यात घुसणे, लोकांचा जीव धोक्यात घालणे व पोलिसांच्या निर्देशांची अवहेलना करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.