शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

ड्रॅगनचा तीळपापड! भारतीय जवानांनी चीनकडून नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्नच पाडला हाणून

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 3:48 AM

चीनने फौजा वाढवल्यावर भारतानेही प्रत्युत्तर दिल्यानेच ड्रॅगनचा तिळपापड झाला.

टेकचंद सोनवणेनवी दिल्ली : पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात हेकेखोर चीनलाभारताने राजनैतिक स्तरावरही कठोर शब्दात सुनावले आहे . चीनचे वर्तन दोन्ही देशांच्या आतापर्यंतच्या संबंधांना साजेसे नाही. भारताने कधीही कुणाही देशाच्या हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला नाही. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा कधीही बदलली नाही, अशा शब्दात भारताने चीनचा कांगावा जगासमोर आणला. मेपासूनच चीनने नियंत्रण रेषेनजीक फौजफाटा वाढवला. १९९३ च्या शांतता व सौहार्द कराराचे ते उल्लंघन होते, अशी आठवण भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने करून दिली. चीनने फौजा वाढवल्यावर भारतानेही प्रत्युत्तर दिल्यानेच ड्रॅगनचा तिळपापड झाला.भारतीय जवानांना गस्त घालण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. जे बांधकाम झाले ते भारताने स्वत:च्याच हद्दीत केले. गलवान खोºयातील झटापटीला केवळ चीन जबाबदार आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये १७ जूनला चर्चा झाली. त्यानुसारच चीनने काम करावे. सतत हेच सुरू राहिले तर दोन्ही देशांचे संबंध बिघडण्यासच कारणीभूत ठरेल, असे भारताने ठणकावले. मे महिन्यापासूनच चीनने आपले सैनिक वाढवले. भारतानेही प्रत्यूत्तरात जादा कुमक मागवली. दोन्ही देशांमध्ये लष्करी व राजनैतिक स्तरावर चर्चा सुरू असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी नमूद केले. हिंसक झटापटीनंतर दहा दिवसांनी अखेर चिनी फौजा मागे हटल्या. भारताचा हा मोठा विजय मानला जातो. मात्र पँगाँग सरोवरानजीक प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या हद्दीत चीनने बांधकाम सुरूच ठेवले आहे.गलवान खोºयातील झटापटीनंतर दोन्ही देशांनी आपापल्या हद्दीत लष्करी हालचाली वाढवल्या, मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तैनात केल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. गलवान खोºयावर हक्क सांगून चीनचे रडगाणे तरिही सुरू च आहे. बीजिंगमधून हक्क सांगायचा तर भारतात चीनचे राजदूत मात्र सौहार्दाचा कांगावा करीत आहेत. पहिल्यांद्याच चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या विधानात 'चीनची भारतासोबत काम करून दोन्ही देशांचे संबंध सुधारणे, शांतता प्रस्थापित करण्याची तयारी आहे' असा साळसूद आव दिसत आहे. भारत सतर्क आहे. चर्चा सुरू असली तरी गलवान खोºयातून लष्करास अद्याप माघारी बोलावले जाणार नाही.१५ जूनला झालेल्या झटापटीत भारतीय जवानांनी उध्वस्त केलेला चिनी मंडप पुन्हा त्याच ठिकाणी उभारण्यात आल्याचे वृत्त पसरले होते. सॅटेलाईट इमेजचा आधार त्यासाठी प्रसारमाध्यमांमध्ये घेतला जात होता. लष्कराकडून मात्र अशी कोणताही माहिती देण्यात आली नाही. चीन चचेर्पासूनही पळ काढत आहे. भारताने बीजिंगमधील चिनी लष्करप्रमुखांशी चचेर्ची मागणी केली होती. त्यासाठी हॅटलाईनदेखील उभारण्यात येणार होती. मात्र चीनने यासाठी तयारी दर्शवली नाही. तिबेट व शिनजियांग प्रांताच्या सीमेवर तैनात सर्वोच्च अधिकाऱ्यांमध्ये चचेर्चा प्रस्ताव चीनकडून पुढे करण्यात आला.>लष्करप्रमुखांची बैठकलडाखचा दौरा आटोपून दिल्लीत परतल्यानंतर लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी वरिष्ठ लष्करी व संरक्षण मंत्रालयातील अधिकाºयांशी चर्चा केली. ड्रॅगनचे मनसुबे त्यांनी या बैठकीत सांगितले.नरवणे यांनी दोन्ही दलाच्या प्रमुखांशीदेखील चर्चा केली.गलवान संघर्षात हवाई दलाची भूमिका महत्त्वीच असेल. पूर्व लडाखमध्ये चीनने फौजफाटा काही प्रमाणात वाढवला होता. भारतानेही आपल्या हद्दीतील ६५ पोस्टमध्ये जवानांची संख्या वाढवली आहे.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत