शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला कंटनेर लुटीचा प्रयत्न

By admin | Published: October 30, 2016 10:46 PM

नाशिक : पंचवटी महाविद्यालयासमोरील उड्डाणपुलावर कंटेनरचालकास लुटल्याचा प्रयत्न पोलिसांच्या गस्तीपथकामुळे फसला़ पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असून, तीन जण फरार झाले आहेत़ याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

नाशिक : पंचवटी महाविद्यालयासमोरील उड्डाणपुलावर कंटेनरचालकास लुटल्याचा प्रयत्न पोलिसांच्या गस्तीपथकामुळे फसला़ पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असून, तीन जण फरार झाले आहेत़ याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवटी दंत महाविद्यालयासमोरील उड्डाणपुलावर रविवारी (दि़३०) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास एक कंटेनर थांबलेला होता़ त्याचवेळी विरुद्ध दिशेने जात असलेल्या आडगाव पोलीस ठाण्याच्या गस्तीपथकातील कर्मचार्‍यांना कंटेनरचालकाच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्या़ त्यांनी विरुद्ध बाजूने जाऊन कंटेनरजवळ पोहोचले असता त्यांना पाहून तीन संशयित काळ्यापिवळया वाहनातून पसार झाले, तर उर्वरित मोहम्मद नादीर शहा, उबेद शेख सफदार (रा. शिवाजी चौक) या दोघांना आडगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी दिलीप भोई, खालकर, दीपक दिवटे यांनी शिताफीने पकडले़
संशयित शहा व सफदार या दोघांचीही पोलिसांनी झडती घेतली असता त्यांच्याकडे चॉपर, चाकू तसेच लुटीचे २२ हजार रुपये आढळून आले़ याप्रकरणी कंटेनरचालक शेख मोहम्मद शफीक समद (रा. कानपूर, जि. राजगड मध्य प्रदेश) याच्या फिर्यादीनुसार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान फरार झालेल्या तिघा कर्मचार्‍यांचा पंचवटी पोलीस शोध घेत आहेत़ (प्रतिनिधी)