वाराणसी: महाराष्ट्रात श्रावन महिन्याची सुरुवात झाली नसली, तरी उत्तर भारतात श्रावन महिना सुरू झाला आहे. यादरम्यान, उत्तर प्रदेशच्या वाराणसीतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाराणसीच्या पलाहीपट्टी मार्केटमध्ये काही समाज कंटकांनी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला. परिसरातील एका मंदिरात शिवलिंगांच्या आजुबाजूला तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली. यावेळी लोकांनी वातावरण बिघडवल्याचा आरोप करत पोलिस प्रशासनासमोर तीव्र निषेध नोंदवला.
अराजक घटकांनी शिवलिंगाचे नुकसान केलेवाराणसी-सिंधोरा मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला होता. मात्र, घटनास्थळी पोहोचलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संतप्त लोकांना शांत करत शिवलिंगावर तातडीने फरशा बसविल्या. मिळालेल्या माहतीनुसार, काशीच्या चोलापूर पोलीस स्टेशन हद्दीतील पलाहीपट्टी बाजारातील युनियन बँकेजवळ एक शिवमंदिर आहे. या मंदिरात सिमेंटचे शिवलिंग बसवण्यात आले आहे. सकाळी जेव्हा स्थानिक लोक मंदिराची स्वच्छता करण्यासाठी तेथे पोहोचले तेव्हा त्यांना शिवलिंगाची तोडफोड झाल्याची माहिती मिळाली. यानंतर घटनेची माहिती तात्काळ गावप्रमुख हुकुम सिंह यांना देण्यात आली.
प्रधान आणि पोलिसांनी ग्रामस्थांना शांत केलेदुसरीकडे शिवलिंगाची तोडफोड होताच ग्रामस्थांनी मंदिरात मोठी गर्दी केली. एवढेच नाही तर शिवलिंगाचे नुकसान झाल्याची माहिती मिळताच त्या मार्गावरून जाणाऱ्या कंवरियांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यादरम्यान गर्दीमुळे वाराणसी-सिंधोरा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, यावेळी ग्रामस्थ व उच्च पोलीस अधिकाऱ्यांनी संतापलेल्या ग्रामस्थांची समजूत घालून आणि शिवलिंगाची दुरुस्ती करून सर्वांना शांत केले. सध्या पोलीस या घटनेतील आरोपींचा शोध घेत आहेत.