ॅसिमीसह देशविरोधी कारवाया करणार्यांवर लक्ष
By admin | Published: March 11, 2016 10:25 PM
जळगाव: जळगाव जिल्ात सिमीची पार्श्वभूमी पाहता सिमीसह देशविरोधी कारवाया करणार्या संघटना व कार्यकर्त्यांच्या हालचालींवर पोलीस यंत्रणेचे लक्ष आहेच, काही गोष्टी लक्षात आल्यावर त्याची पडताळणी करुन कारवाई केली जात असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विनय चौबे यांनी दिली. शेख असलम याच्यावर सिमी प्रकरणात सुरतमध्ये गुन्हा दाखल असला तरी जळगावमधील कारवाई ही बनावट सीम कार्ड वापरले म्हणूनच केली असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
जळगाव: जळगाव जिल्ात सिमीची पार्श्वभूमी पाहता सिमीसह देशविरोधी कारवाया करणार्या संघटना व कार्यकर्त्यांच्या हालचालींवर पोलीस यंत्रणेचे लक्ष आहेच, काही गोष्टी लक्षात आल्यावर त्याची पडताळणी करुन कारवाई केली जात असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विनय चौबे यांनी दिली. शेख असलम याच्यावर सिमी प्रकरणात सुरतमध्ये गुन्हा दाखल असला तरी जळगावमधील कारवाई ही बनावट सीम कार्ड वापरले म्हणूनच केली असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक तपासणीनिमित्त चौबे हे तीन दिवस जिल्हा दौर्यावर आहेत. शुक्रवारी जळगाव विभागाची तपासणी, कर्मचार्यांचा दरबार व गुन्हे आढावा बैठक घेतल्यानंतर संध्याकाळी पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांच्या दालनात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी डॉ.सुपेकर व अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर उपस्थित होते.भुसावळ येथे रेल्वेची वेबसाईट हॅक केल्याच्या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. यात कोणाचा हात आहे हे तपासात निष्पन्न होईल, त्यानंतर संबंधित व्यक्तीवर कारवाई केली जाईल, असे चौबे म्हणाले. मुंबई बॉम्बस्फोटात फाशीची शिक्षा सुनावलेल्या आसिफ शेख याच्या कुटूंबियाला आर्थिक मदतीसाठी पत्रके वाटल्याच्या प्रकाराबाबत आपणास काहीही माहित नाही, मात्र तसा प्रकार झाला असेल तर चौकशी केली जाईल. सिमेलगतच्या राज्यातील महानिरीक्षकांची बैठकवाढती गुन्हेगारी रोखण्यासह झालेल्या गुन्ांचा तपास व्हावा व आरोपींवर लक्ष ठेवता यावे यासाठी सिमे लगतच्या राज्यातील पोलिसांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. त्यापार्श्वभूमीवर इंदूर, सुरत, दमन व दादरा-नगर हवेली येथील विशेष पोलीस महानिरीक्षकांची नाशिक येथे बैठक घेतली जाणार आहे. त्यांच्या हद्दीतील गुन्हेगार कोण, त्यांची गुन्हे करण्याची पध्दत काय याबाबतच्या माहितीची आदान-प्रदान या बैठकीतून केली जाईल. विभागातील अधिकार्यांचाही गृपघरफोडी, चोरी व दरोड्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नाशिक विभागातील पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक व स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांचा एक गृप तयार करण्यात आला आहे. त्यांच्या हद्दीतील गुन्ांची व गुन्हेगारांची माहिती व फोटो या गृपच्या माध्यमातून शेयर केले जातील. दिवसा व रात्रीच्या गस्त संदर्भातही नवीन पध्दत सुरु करण्यात आल्याचे चौबे यांनी सांगितले.अपहरण प्रकरणाचा जलदगतीने तपासजिल्हा रुग्णालयातून एक महिन्याच्या बाळाचे अपहरण झाल्याच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा व जिल्हा पेठ या दोन यंत्रणांकडे तपास सोपविण्यात आला आहे. अधिक गतीने तपास करण्याबाबत अधिकार्यांना सूचना केल्या आहेत. लवकरच त्यात यश येईल, असा आशावाद चौबे यांनी व्यक्त केला. अन्य ठिकाणच्या अपहरणाच्या घटनांमुळे शाळा, महाविद्यालय परिसरात गस्त, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासह पालक व प्राचार्य, मुख्याध्यापकांची बैठक घेण्याचे आदेश देण्यात आले आहे.कर्मचार्यांच्या २५० घरांच्या प्रस्तावाला मान्यतापोलीस मुख्यालयात कर्मचार्यांच्या २५० निवासस्थानाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मुख्यालयातील दुरुस्तीसाठी चार तर भुसावळ येथील दुरुस्तीसाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती चौबे यांनी दिली. तसेच प्रत्येक कर्मचार्याला त्याची कामगिरी तपासता यावी यासाठी त्याला त्याच्या सर्व्हीस बुकची एक प्रत दरवर्षी उपलब्ध करुन दिली जाणार आहे.चौघ वाळूमाफियांचा एमपीडीएचा प्रस्ताववाळूच्या संदर्भातील होणार्या घटना पाहता जिल्ात चार वाळू व्यावसायिकांना एमपीडीए लावण्याचा प्रस्ताव पोलीस दलाने तयार केला आहे, त्याला मान्यता मिळावी यासाठी तो प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठविण्यात आला आहे. वाळूच्या संदर्भात अधिकारी व कर्मचार्यांवर होणारे हल्ले यामुळे भविष्यात त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. पोलीस स्टेशनसमोर दगडफेक करणार्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश चौबे यांनी पोलीस अधीक्षकांना दिले.