शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मल्ल्याच्या संपत्तीचा होणार लिलाव; कोर्टाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2020 3:42 AM

बँकांचे कोट्यवधी रुपये बुडवून फरार झालेल्या विजय मल्ल्याला विशेष पीएमएलए न्यायालयाने बुधवारी दणका दिला.

मुंबई : बँकांचे कोट्यवधी रुपये बुडवून फरार झालेल्या विजय मल्ल्याला विशेष पीएमएलए न्यायालयाने बुधवारी दणका दिला. एसबीआयसह अन्य १५ बँकांच्या समूहाला मल्ल्याकडील कर्जवसुलीसाठी त्याच्या जंगम मालमत्तेचा लिलाव करून त्या विकण्याची परवानगी देण्यात आली आहे. मल्ल्या २०१६ मध्ये देश सोडून लंडनमध्ये फरार झाला. तिथे त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू आहे.न्यायालयाने २०१६ मध्ये मल्ल्याला फरार घोषित केल्यानंतर यूबी कंपनीचे शेअर्स न्यायालयाने जप्त करण्यास सांगितले होते. न्यायालयाने बँकांच्या समूहाला मल्ल्याच्या जंगम मालमत्तेचा लिलाव करण्याची परवानगी दिली. मात्र या निर्णयाला त्याला उच्च न्यायालयात आव्हान देता यावे, यासाठी निर्णयास १८ जानेवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. किंगफिशर एअरलाइन्सचा प्रमुख असलेल्या मल्ल्याने बँकांचे ९ हजार कोटी रुपये बुडविले आहे. त्याला पूर्वीच ‘फरार आर्थिक गुन्हेगार’ म्हणून जाहीर केले. एखाद्या व्यक्तीला फरार जाहीर केल्यानंतर त्याची जंगम मालमत्ता जप्त करण्याचा आदेश विशेष न्यायालय देऊ शकते. त्याला न्यायालयाने वॉरंट बजाविले होते. मात्र, मल्ल्याने न्यायालयात हजर राहणे टाळल्याने त्याला फरार घोषित केले.वकील म्हणाले, आदेशाची प्रत मिळू देतन्यायालयाने यूबीएचएलच्या शेअर्सवर आणलेली जप्ती हटविली. मात्र, ही संपत्ती एसबीआयच्या ताब्यात द्यायची की एसबीआय नेतृत्व करीत असलेल्या बँकांच्या समूहाला द्यायची, याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे न्यायालयाच्या लेखी आदेशाची प्रत मिळाल्यावर स्पष्ट होईल,’ असे मल्ल्याचे वकील अमित देसाई यांनी सांगितले.

टॅग्स :Vijay Mallyaविजय मल्ल्या