२५० क्विंटल भाजीपाल्याची विक्री बजार समितीच्या यार्डात लिलाव : शेतकर्यांच्या मदतीसाठी १५ कर्मचारी, ५० हजार शुल्क बुडाले
By admin | Published: July 13, 2016 12:14 AM
जळगाव : बाजार समितीमधील फळ व भाजीपाला मार्केट यार्डातील अडतदारांनी पुकारलेला संप झुगारत शेतकर्यांच्या २५० क्विंटल भाजीपाल्याची विक्री अडतदारांशिवाय मंगळवारी बाजार समितीमध्ये झाली. यातच हा संप कायम ठेऊ, अशी भूमिका संपाच्या दुसर्या दिवशीही अडतदार असोसिएशनने जाहीर केली आहे.
जळगाव : बाजार समितीमधील फळ व भाजीपाला मार्केट यार्डातील अडतदारांनी पुकारलेला संप झुगारत शेतकर्यांच्या २५० क्विंटल भाजीपाल्याची विक्री अडतदारांशिवाय मंगळवारी बाजार समितीमध्ये झाली. यातच हा संप कायम ठेऊ, अशी भूमिका संपाच्या दुसर्या दिवशीही अडतदार असोसिएशनने जाहीर केली आहे. भाजीपाल्याची खरेदी व विक्री कुठल्याही शुल्काशिवाय झाल्याने अडतदारांना शेकडा सहा टक्के याप्रमाणे शुल्क देण्याची वेळ ग्राहकांवर आली नाही. यात अडतदारांचे संपामुळे मंगळवारी ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. सुमारे २५० क्विंटल भाजीपाल्याची विक्री झाल्याची माहिती सभापती प्रकाश नारखेडे यांनी दिली. यार्डात सकाळीच लिलावअडतदारांशिवाय बाजार समितीच्या फळ व भाजीपाला मार्केट यार्डात सकाळी सहा वाजताच लिलाव सुरू झाले. शेतकर्यांनी भाव सांगितले आणि ग्राहकांनी आपल्या कुवतीनुसार खरेदी केली. जेवढा भाजीपाला आणला गेला तेवढा विकला गेला. १५ कर्मचार्यांची नियुक्तीबाजार समिती प्रशासनाने अडतदारांनी पुकारलेल्या संपामध्ये शेतकर्यांना त्रास होऊ नये, अडचणी येऊ नयेत यासाठी १५ कर्मचारी सकाळी सहा ते आठ या वेळेत फळ व भाजीपाला मार्केट यार्डात नियुक्ती केली आहे. तसे परिपत्रक जारी केल्याची माहिती बाजार समितीचे सचिव एस.पी.पाटील यांनी दिली. बाजार समिती खुली राहणारअडतदारांनी संप पुकारलेला असला तरी शेतकरी आपला शेतमाल थेट बाजार समितीमध्ये विकू शकतील. त्यासाठी बाजार समितीच्या फळ व भाजीपाला मार्केट यार्डाचे दरवाजेे खुले राहतील. ग्राहकांनी रोज सकाळी यावे. कुठल्याही शुल्काशिवाय भाजीपाल्याची खरेदी विक्री करता येईल, असे बाजार समिती प्रशासनाने म्हटले आहे. अडतदारांचे हित कोण जोपासणार?बाजार समितीमध्ये अडतदार हे ग्राहक, शेतकरी, व्यापारी यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. त्यांनी कधी शेतकर्यांची पिळवणूक होईल यासाठी काम केले नाही. शेतकर्यांना रोखीने पैसे मिळावेत, मागणी व पुरवठा याचे गणित लक्षात घेऊन भाव असावेत अशी भूमिका अडतदारांनी घेतली. परंतु आता खरेदीदारांकडून शुल्क घेण्यासंबंधी फतवा निघाला. तसेच खुला बाजारमुळे बाजार समितीच्या अस्तित्वावर, अडतदारांच्या अस्तित्वावर बंधने आणण्याचा प्रकार सुरू आहे. अडतदारांचेही हित जोपासले जावे, असे फळ व भाजीपाला मार्केट यार्ड अडत असोसिएशनने म्हटले आहे.