श्रीनगर : उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात एका वाहनावर शुक्रवारी दुपारी बर्फ कोसळून वाहन व त्यातील सारे जण आत गाडले गेले. त्यातील ११ जणांचा मृत्यू झाला आहे. या वाहनातून किती प्रवासी होते हे स्पष्ट झालेले नाही.कुपवाडाचे उपायुक्त खालिद जहांगीर यांनी सांगितले की, कुपवाडा- तंगधार मार्गावर सधान टॉपजवळ हे वाहन अडकले होते. घटनास्थळावरुन आतापर्यंत ११ मृतदेह बाहेर काढले असून, त्यात तीन वर्षांची मुलगीही आहे. एका अधिकाºयाचा मृतदेहही जवळच्या भागातून ताब्यात घेण्यात आला आहे. चार जणांना जिवंत बाहेर काढले असून, त्यात १0 वर्र्षाच्या मुलाचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)दरीत बस कोसळून सहा जण ठारकाश्मीरच्या डोंगराळ भागात मिनी बस खोल दरीत कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले. ही दुर्घटना उधमपूरपासून ३० किमी दूर करोवाजवळ शनिवारी दुपारी घडली. ही बस उधमपूरहून रामनगरकडे जात होती.करोवाजवळ चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली. चार जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात हिमस्खलन; अकरा जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 11:33 PM