मुंबई - नोकरीच्या ठिकाणी काही जण प्रेमात पडतात. एखादी व्यक्ती तुमच्या मनाला भावते. तिच्याविषयी तुमच्या मनात प्रेमाचा अंकुर फुलतो. कोणाच्या प्रेमात पडणे अजिबात चुकीचे नाही. पण ऑफिसमध्ये प्रेम भावना व्यक्त करणे, रोमांस करणे तुम्हाला महाग पडू शकते. या कारणांमुळे ऑफिसमध्ये रोमांस अडचणींचा ठरु शकतो.
- ऑफिसमध्ये तुम्हाला एखादी व्यक्ती आवडली तर चुकूनही कधी बॉसला ही गोष्ट सांगू नका. तुम्ही तुमच्या कामाबद्दल गंभीर नाही असे तुमच्या बॉसला वाटू शकते.
- दिवसातले नऊ ते दहा तास तुम्ही ऑफिसमध्ये घालवत असाल तर सहकर्मचा-याबद्दल तुमच्या मनात आकर्षण, प्रेमभावना निर्माण होणे सामान्य बाब आहे. तुम्हाला जे नाते जोडायचे आहे त्याबद्दल तुम्ही गंभीर असाल तर कोणालाही ही गोष्ट कळणार नाही याची काळजी घ्या.
- ऑफिसमधल्या ज्या व्यक्तीबरोबर तुमचे सूर जुळले आहेत तिच्याशी किंवा त्याच्याशी जास्त बोलू नका. ब्रेकफास्ट, लंच आणि चहा प्यायला एकत्र जाणे टाळा.
- ऑफिसमध्ये सतत तुम्ही तुमच्या पार्टनरला सपोर्ट करणे आवश्यक नाही. जर तुम्ही असे वागलात तर अन्य सहकारी तुमच्या विरोधात जाऊ शकतात तसेच त्यांच्या मनात तुमच्या नात्याबद्दल संशय निर्माण होईल.
- भले तुम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात असाल पण कार्यालयीन शिस्त कायम ठेवा. ऑफिसमध्ये तुमचा रोमांस इतरांना खटकू शकतो तसेच अडचणीत आणणार ठरु शकतो.
- तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल कितीही गंभीर असाल तरी त्याचा तुमच्या कामावर परिणाम होऊ देऊ नका. तुमचा परफॉर्मंस खराब होऊ शकतो. त्यामुळे ऑफिसमध्ये असताना आपल्या भावनांना आवर घाला आणि कामावर लक्ष द्या.