नवी दिल्ली- केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाकडे राम मंदिरासाठीची वादग्रस्त जमीन वगळता ऊर्वरित जमीन रामजन्मभूमी न्यासाला द्यावी, अशी मागणी केली आहे. केंद्रानं याचिका दाखल करत ही मागणी केली आहे. 67 एकर जमिनीचे केंद्र सरकारने अधिग्रहण केले होते, परंतु सर्वोच्च न्यायालयानं त्या अधिग्रहणाला स्थगिती दिली होती. त्यातच आता केंद्रानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत 67 एकरातील वादग्रस्त जमीन वगळता उर्वरित जमीन रामजन्मभूमी न्यासाला द्यावी, अशी मागणी केली आहे.67 एकरातील 2.77 एकर वादग्रस्त जमीन चहूबाजूंनी पसरलेली आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या रामजन्मभूमी- बाबरी मशीद खटल्याची मंगळवारची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं रद्द केली आहे. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठातील एक न्यायाधीश न्या. शरद बोबडे 29 जानेवारीला उपस्थित राहणार नसल्यामुळे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठ 29 जानेवारीला या प्रकरणाची सुनावणी घेणार नसल्याचंही स्पष्ट केलं होतं.
Ayodhya Dispute: वादग्रस्त जमीनवगळता उर्वरित जागा रामजन्मभूमी न्यासाला द्या, केंद्राची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 11:24 AM
केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाकडे राम मंदिरासाठीची वादग्रस्त जमीन वगळता ऊर्वरित जमीन रामजन्मभूमी न्यासाला द्यावी, अशी मागणी केली आहे.
ठळक मुद्दे केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाकडे राम मंदिरासाठीची वादग्रस्त जमीन वगळता ऊर्वरित जमीन रामजन्मभूमी न्यासाला द्यावी 67 एकर जमिनीचे केंद्र सरकारने अधिग्रहण केले होते, परंतु सर्वोच्च न्यायालयानं त्या अधिग्रहणाला स्थगिती दिली होती. केंद्रानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत 67 एकरातील वादग्रस्त जमीन वगळता उर्वरित जमीन रामजन्मभूमी न्यासाला द्यावी, अशी मागणी केली