नवी दिल्ली - अयोध्या प्रकरणाची 29 जानेवारीला होणारी सुनावणी दिवस पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या घटनापीठातील एक न्यायमूर्ती 29 जानेवारी रोजी अनुपस्थित राहणार असल्याने ही सुनावणी टळली आहे. दोन दिवसांपूर्वीच या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी पाच सदस्यीच घटनापीठाची स्थापना केली होती. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे अॅडिशनल रजिस्ट्रार (लिस्टिंग) यांनी प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार घटनापीठापमध्ये असलेले न्यायमूर्ती एस. ए. बोबडे हे 29 जानेवारीला अनुपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या दिवशी होणारी अयोध्या प्रकरणाची सुनावणी होणार नाही.
अयोध्या प्रकरणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर, 29 जानेवारीला एक न्यायमूर्ती राहणार अनुपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 5:42 PM
अयोध्या प्रकरणाची 29 जानेवारीला होणारी सुनावणी दिवस पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या घटनापीठातील एक न्यायमूर्ती 29 जानेवारी रोजी अनुपस्थित राहणार असल्याने ही सुनावणी टळली आहे.
ठळक मुद्देअयोध्या प्रकरणाची 29 जानेवारीला होणारी सुनावणी दिवस पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे घटनापीठापमध्ये असलेले न्यायमूर्ती एस. ए. बोबडे हे 29 जानेवारीला अनुपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या दिवशी होणारी अयोध्या प्रकरणाची सुनावणी होणार नाहीया प्रकरणाच्या याआधी झालेल्या सुनावणी वेळी न्यायमूर्ती उदय ललित यांनी पाच सदस्यीय घटनापीठातून माघार घेतली होती