शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

नमाज प्रकरणाचा निकाल भाजपाच्या पथ्यावर... जाणून घ्या कसे होईल २०१९चे राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 3:26 PM

29 ऑक्टोबरपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू होणार राम जन्मभूमी प्रकरणाची सुनावणी

नवी दिल्ली: अयोध्या रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाशी संबंधित 1994 च्या इस्माईल फारुकी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. मशिदीत नमाज अदा करणं इस्लामचा अविभाज्य घटक आहे की नाही, हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे देण्याची आवश्यकता नसल्याचं न्यायालयानं आपल्या निकालात म्हटलं. यामुळे आता अयोध्या रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाच्या सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. 29 ऑक्टोबरपासून राम मंदिर प्रकरणाची सुनावणी होणार आहे. याचा मोठा राजकीय फायदा भाजपाला होऊ शकतो. मशिदीत नमाज अदा करणं इस्लामचा अविभाज्य आहे की नाही, याबद्दलचा निकाल मोठ्या खंडपीठाकडे सोपवण्याची गरज नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयानं आज दिला. हे प्रकरण अयोध्या रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाशी संबंधित होतं. त्यामुळे हे प्रकरण जर मोठ्या खंडपीठाकडे गेलं असतं, तर रामजन्मभूमीच्या सुनावणीला उशीर झाला असता. कारण हे प्रकरण मार्गी लागल्यावरच अयोध्येतील वादग्रस्त जमिनीबद्दलच्या सुनावणीला सुरुवात झाली असती. मात्र नमाजाचं प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे जाणार नसल्यानं आता अयोध्या प्रकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे 29 ऑक्टोबरपासून अयोध्या रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू होईल.29 ऑक्टोबरपासून अयोध्या प्रकरणाची सुनावणी सुरू होणार असल्यानं त्याचा मोठा लाभ भाजपाला होऊ शकतो. राम मंदिराच्या मुद्यावर भाजपा देशभरात पोहोचला. भाजपाची पाळंमुळं देशभरात रुजवण्यात राम मंदिराच्या मुद्याचा मोठा वाटा आहे. 2014 मध्ये नरेंद्र मोदींना एकहाती सत्ता मिळाल्यावर राम मंदिराचा मुद्दा मार्गी लागेल, अशी अपेक्षा भाजपा समर्थकांना होती. मात्र हे प्रकरण न्यायालयात असल्यानं मोदी सरकारला फार काही करता आलं नाही. मात्र आता हे प्रकरण न्यायालयाकडून निकाली निघण्याची शक्यता आहे. लोकसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. त्यात जर रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाचा निकाल भाजपाच्या बाजूनं लागल्यास त्याचा मोठा राजकीय फायदा भाजपाला मिळेल. मंदिर वही बनायेंगे ही भाजपाची घोषणा होती. ती निवडणुकीच्या आधी प्रत्यक्षात आल्यास या लाटेवर भाजपाला लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळू शकतं. 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरMosqueमशिदNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाAmit Shahअमित शाह