अयोध्या: अयोध्येतील मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम विमानतळाचे बांधकाम वेगाने सुरू झाले आहे. अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा लूक राम मंदिरासारखा बांधण्यात येत आहे. सध्या विमानतळाचे 25 टक्के काम पूर्ण झाले आहे. 2023 मध्ये विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होईल, असा विश्वास आहे.
अयोध्येत सर्वत्र राम मंदिराची प्रतिकृतीराम मंदिरासोबतच विमानतळाचे बांधकामही पूर्ण करण्यात येणार आहे. भाविकांना विमानामार्गे अयोध्येत येता यावे, यासाठी मंदिरासोबत याचे काम वेगाने केले जात आहे. विशेष म्हणजे, विमानतळाच्या टर्मिनलचे स्वरुप राम मंदिरासारखेच बांधण्यात येणार आहे. भाविक अयोध्या विमानतळावर पोहोचल्यावर त्यांना आपण रामाच्या नगरीत असल्याचा भास होईल. विमानतळ असो, रेल्वे स्थानक असो की आंतरराष्ट्रीय बसस्थानक, प्रत्येकाचे रूप राममंदिराच्या रूपात साकारले जात आहे.
विमानतळावर उतरताच राम मंदिराचे दर्शन मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम विमानतळाच्या पहिल्या टप्प्याच्या विकासासाठी 317.855 एकर जमीन यापूर्वीच भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. या जमिनीवर पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे. 2023 मध्ये धावपट्टी आणि त्याच्याशी संबंधित इमारतीचे काम पूर्ण होईल. अयोध्येतील श्री राम आंतरराष्ट्रीय विमानतळाचे बांधकाम राममंदिराच्या धर्तीवर केले जात आहे. दगडांचा वापर असो की त्यावर केलेले कोरीव काम असो, सर्व काही तसेच असेल.