लखनऊ - अयोध्या नगरी आमच्यासाठी अत्यंत श्रद्धेचा, भावनेचा, भक्तीचा आणि अस्मितेचा विषय आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर, पहिल्यांदाच येथे आल्यानंतर अत्यंत आनंद वाटत आहे. समाधान वाटत आहे. येथे हिंदुत्वाचे, भगवे वातावरण दिसून येत आहे. यासाठी मी सर्व राम भक्त आणि योगीजी आणि त्यांच्या मंत्र्यांचे आणि आमच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो. कारण आपले हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि लाखो-करोडो राम भक्तांचे स्वप्न होते की, अयोध्येत भव्य दिव्य असे राम मंदिर बनावे. हे कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुरू आहे. ते लवकरच पूर्ण होणार आहे. सर्वांचे हे स्वप्न पूर्ण होत आहे. यासाठी मी पंतप्रधान मोदी आणि योगीजींचेही आभार मानतो,असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ते लखनऊ विमात तळाबाहेर पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी, आमच्या अयोध्या येत्रेसाठी अत्यंत उत्कृष्ट व्यवस्था केली, यासाठीही मी योगीजींना धन्यवाद देतो, असेही शिंदे म्हणाले. तसेच, प्रभू रामचंद्रांच्या आशिर्वादाने आम्ही महाराष्ट्रात हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे सरकार स्थापन केले आहे. जे सरकार 2019 लाच स्थापन व्हायरल हवे होते. ते आम्ही गेल्या आठ नऊ महिन्यांपूर्वी केले. त्यामुळे आमची विचारसरणी एक आहे. आमच्या पक्षाची विचारधारा एक आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही अयोध्येत येणार -शिवसेना-भाजप युती राज्यात अत्यंत मजबुतपणे काम करत आहे, विकासाचे काम करत आहे. पूर्वी राज्यात (महाराष्ट्रात) साधूंचे हत्याकांड झाले, तसे आमच्या राज्यात अजीबात होणार नाही. आमच्या राज्यात विकासाची कामे होती. त्यामुळे भाजप-शिवसेना युतीचे मंत्री आणदार खासदार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही अयोध्येत येणार आहेत, असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.
ढोलताशांच्या गजरात मुख्यमंत्यांचे स्वागत -लखनऊ विमान तळाबाहेर ढोलताशांच्या गजरात मुख्यमंत्यांचे स्वागत करण्यात आले. खासदार श्रीकांत शिंदेही एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांचे मोठा हार आणि गदा देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी शिंदे यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, आढळराव पाटील, राम शिंदे आदी नेतेही आयोध्या दौऱ्यावर गेले आहेत.