शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

"माझी हत्या झाली तरी चालेल पण प्रभू श्रीरामाच्या नावे बनणाऱ्या मंदिराचा पैसा चोरी होऊ देणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 2:21 PM

AAP Sanjay Singh Slams BJP : संजय सिंह यांनी अयोध्येतील राममंदिरासाठी राममंदिर ट्रस्टने खरेदी केलेल्या जमीन व्यवहारात घोटाळ्यांचा आरोप केला आहे.

नवी दिल्ली - आम आदमी पक्षाचे (आप) राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी अयोध्येतील राममंदिरासाठी राममंदिर ट्रस्टने खरेदी केलेल्या जमीन व्यवहारात घोटाळ्यांचा आरोप केला आहे. संजय सिंह म्हणाले की, ट्रस्टने दोन कोटी रुपयांची जमीन १८.५ कोटी रुपयांत खरेदी केली होती. दोन्ही देवघेव पाच मिनिटांत केली गेली, असाही त्यांचा दावा आहे. यानंतर आता संजय सिंह यांच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे. संजय सिंह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. 

"माझ्या घरावर हल्ला झाला आहे. भाजपावाल्यांनी कान उघडे ठेवून ऐकावं, कितीही गुंडगिरी केली तरी प्रभू श्रीरामाच्या नावे बनणाऱ्या मंदिराचा पैसा चोरी होऊ देणार नाही. त्यासाठी माझी हत्या झाली तरी चालेल" असं संजय सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच भाजपाला जाहीर आव्हान देत कितीही गुंडगिरी केली तरी मंदिराचा पैसा चोरी होऊ देणार नाही असं म्हटलं आहे. संजय सिंह यांचा दावा आहे की, राममंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांच्या इशाऱ्यावर देवाण-घेवाण केली गेली होती.  ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा आणि अयोध्याचे महापौर ऋषिकेश उपाध्याय रजिस्ट्रीचे साक्षीदार होते, असे सांगून सिंह यांनी या व्यवहाराची सीबीआय आणि ईडीकडून चौकशीची मागणी केली.

संजय सिंह म्हणाले की, ‘मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्री राम यांच्या नावावर इतका मोठा घोटाळा ऐकून तर  पायाखालची जमीन निसटून जाईल. हा देशातील कोट्यवधी लोकांच्या आस्थेवर आघात आहे. राममंदिरासाठी जमीन खरेदीसंदर्भात समाजवादी पक्षाचे माजी आमदार पवन पांडेय यांनी केलेल्या आरोपावर मी काही भाष्य करण्याआधी आरोपांचा अभ्यास करीन, असे श्री राम मंदिर ट्रस्टचे महासचिव आणि विश्व हिंदू परिषदेचे वरिष्ठ नेते चंपत राय यांनी म्हटले. पूर्वी अनेक आरोप झाले आहेत. एवढेच काय महात्मा गांधी यांच्या हत्येचाही आरोप झाला आहे.

संतापजनक! वृद्ध मुस्लीम व्यक्तीला बेदम मारहाण; 'जय श्री राम' बोलण्याची केली जबरदस्ती, Video व्हायरल

उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. काही तरुणांनी एका वृद्ध मुस्लीम व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यांना 'जय श्री राम' बोलण्याची सक्ती देखील केली आहे. जबरदस्तीने त्यांना जय श्री राम बोलायला लावलं. या घटनेचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये काही तरुण वृद्ध व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहेत. 

टॅग्स :AAPआपRam Mandirराम मंदिरBJPभाजपाPoliticsराजकारणIndiaभारत