शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
3
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
4
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
5
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
6
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
7
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
8
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
9
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
10
IND vs SA: फ्लॉप शोचा सिलसिला संपला! Abhishek Sharma नं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
11
BJP च्या विजयासाठी RSS ने आखली योजना; प्रत्येक मतदारसंघासाठी बनवला 1-2-3 चा फॉर्म्युला
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

जय श्री राम! राम मंदिरासाठी 26 दिवसांत तब्बल 1000 कोटी रुपयांचं दान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 10:32 AM

Ram Janambhoomi Teerth kshetra Trust : राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत रायने यांनी आता राम मंदिरासाठी सतत दान येत असल्याची माहिती दिली आहे.

नवी दिल्ली - अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी देणग्या गोळा करण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री यांनी या मोहिमेला प्रतिसाद देत देणग्या दिल्या आहेत. राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे (Ram Janambhoomi Teerth kshetra Trust) महासचिव चंपत रायने (Champt Rai) यांनी आता राम मंदिरासाठी (Ram Mandir) सतत दान येत असल्याची माहिती दिली आहे. दान आलेली एकूण रक्कम ही जवळपास एक हजार कोटी रुपये आहे. 1 लाख 50 हजार लोक धन संग्रह अभियानासाठी जोडले असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे

चंपत राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिराच्या उभारणीसाठी परिसरात सुरू असलेलं खोदकाम जवळपास 16 फूटांपर्यंत झालं आहे. ज्या लेवलवर 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूजा केली होती, त्या लेवलपासून 5 मीटर खाली जमिनीचं खोदकाम झालं आहे. अशोक सिंघल यांच्या काळात आर्किटेक्ट चंद्रकांत सोनपुरासह 1992 मध्ये एक करार झाला होता, त्यात काही मुद्दे वाढवण्यात आले आहेत. दुसरा करार 70 एकरात मंदिराचा भाग सोडून बाकी उरलेल्या भागाचा विकास करणं आहे. हा भाग विकसित करण्यासाठी टाटा कंसल्टेंसीसह करार झाला आहे. 

राम मंदिराच्या निर्माणासाठी तीन करार

तिसरा करार उरलेल्या भागावर कुठे बिल्डिंग उभारली जाईल, त्याचं वास्तू शास्त्र काय असेल, त्याचं मानचित्र, डिटेलिंग कसं असेल हा करार आहे. हा करार नोएडातील फार्म डिझाइन असोसिएटसह झाला आहे.एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 5 ऑगस्ट रोजी अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले आहे. त्यानंतर, मंदिराच्या कामाला गती मिळाली आहे. राम मंदिर उभारणीसाठी रामनाथ कोविंद यांनी आपल्यातर्फे आणि आपल्या कुटुंबीयाच्या वतीने पाच लाख, 100 रुपयांची देणगी दिली. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या पत्नी उषा नायडू यांनी पाच लाख, 11 हजार रुपयांची देणगी दिली. 

अयोध्या विमानतळाचं नाव आता "मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम", योगी सरकारचा निर्णय

अनेक राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनीही देणग्या दिल्याची माहिती मिळाली आहे. अगदी सामान्य माणसांपासून, व्यापारी, उद्योजकांपर्यंत सर्वजण या मोहिमेत सहभागी होत राम मंदिरासाठी देणग्या देत आहेत. देशभरात ही मोहीम राबवली जाणार असून, यातून जमा झालेली रक्कम केवळ राम मंदिराच्या निर्माणासाठी वापरली जाणार आहे. दरम्यान, विश्व हिंदू परिषदेच्या वतीने देणगी गोळा करण्याची देशव्यापी मोहीम सुरू करण्यात आली. ही मोहीम 27 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असून, 13 कोटी देशवासीयांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. 

राम मंदिराची प्रतिकृती असलेल्या उत्तर प्रदेशच्या चित्ररथाने पटकावला प्रथम क्रमांक

राजपथावर निघालेल्या परेडमध्ये यंदा उत्तर प्रदेशकडूनराम मंदिराची प्रतिकृती उभारत चित्ररथ सादर करण्यात आला. सर्वोत्कृष्ट चित्ररथ म्हणून यंदा उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला. राम मंदिराची प्रतिकृती असलेला चित्ररथ राजपथावरून मार्गस्थ झाला तेव्हा प्रेक्षकांकडूनही त्याचं टाळ्या वाजवून भरभरून कौतुक करण्यात आलं. तर काही जणांनी या मंदिरालाच हात जोडून नमस्कार केला. उत्तर प्रदेशचे माहिती संचालक शिशिर यांनी उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाल्याची माहिती दिली होती. "यंदाच्या वर्षी प्रजासत्ताक दिवसाला उत्तर प्रदेशच्या भव्य चित्ररथाचा प्रथम स्थान देऊन गौरव करण्यात आला आहे. सर्व टीमला मनापासून शुभेच्छा. गीतकार विरेंद्र सिंह यांचे विशेष आभार" असं शिशिर यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ