अयोध्या - राम जन्मभूमी मंदिर उभारणीच्या तयारीला वेग आला आहे. यातच मंदिराखाली ट्ईम कॅप्सूल टाकणार असल्याचे वृत्त आले होते. यात टाईम कॅप्सूलमध्ये मंदिर उभारणीचा संपूर्ण इतिहास असेल, असेही सांगण्यात आले होते. मात्र आता, श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे महासचिव चंपत राय यांनी हे वृत्त चुकीचे असल्याचे म्हणत, मंदिराखाली कसल्याही प्रकारची टाईम कॅप्सूल ठेवण्यात येणार नाही, असे म्हटले आहे.
मात्र, राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य कामेश्वर चौपाल यांनी रविवारी दावा केला होता, की भविष्यात राम मंदिराच्या मुद्द्यावर कसल्याही प्रकारचा वाद उत्पन्न होऊ नये म्हणून, मंदिराखाली एक टाईम कॅप्सूल ठेवण्यात येणार आहे. मात्र, आता हा दावा मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी फेटाळून लावला आहे. तसेच हे वृत्त चुकीचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
टाइम कॅप्सूल म्हणजे नेमकं काय? -टाइम कॅप्सूल एखाद्या कंटेनरसारखे असेत. ती एका विष्ट धातूने तयार केलेले असते. हा धातू अनेक धातूंचे मिक्षण असते. हा धातू हजारोवर्ष सुरक्षित असतो. प्रसिद्ध झालेल्या वृत्तांत सांगण्यात आले होते, की या कॅप्सूलमध्ये ताम्रपत्रावर राम मंदिराचा इतिहास लिहिण्यात येईल. यात राम मंदिराचा नकाशा आणि महत्वाची माहिती असेल.
कामेश्वर चौपाल यांचा दावा -श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे ट्रस्टी कामेश्वर चौपाल यांनी म्हटले होते, की शेकडो वर्षांनंतरही राम मंदिरावरून वाद निर्माण होऊ नये यासाठी, ही टाइम कॅप्सूल मंदिराच्या 200 फूट खाली ठेवण्यात येणार आहे. मात्र, त्यांचा दावा चंपत राय यांनी फेटाळून लावला आहे.
लाल किल्ल्याखालीही ठेवण्यात आली आहे टाइम कॅप्सूल -लाल किल्ल्याच्या 32 फूट खालीदेखील टाइम कॅप्सूल ठेवण्यात आली आहे. 15 ऑगस्त 1973 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपल्या हाताने ही टाईम कॅप्सूल किल्ल्याखाली ठेवली. असाही दावा केला जातो, की या टाईम कॅप्सूलमध्ये स्वातंत्र्यांनंतरचा 25 वर्षांचा घटनाक्रम पुराव्यांसह आहे. तेव्हा सरकारच्या या निर्णयावरून मोठा वादही निर्माण झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या -
आई शप्पथ, एवढं बील! : भज्जीच्या घराचं वीज बील पाहून व्हाल अवाक; म्हणाला...
भारत-इस्रायलची कमाल!; आता फक्त आवाज अन् श्वासावरून मिळणार कोरोना चाचणीचा अहवाल
100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर
भारताचा चीनवर दुसरा डिजिटल स्ट्राईक; एकाच झटक्यात पुन्हा 47 अॅप्सवर बंदी!