अयोध्या - भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष उमा भारती यांना पाच ऑगस्टला अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या भूमीपूजनाचे निमंत्रण मिळाले आहे. मात्र त्या भूमीपूजन कार्यक्रमात सहभागी होणार नहीत. 61 वर्षीया उमा भारती भूमिपूजनावेळी अयोध्येत शरयू नदीच्या काठावर असतील.
माजी केंद्रीय मंत्री तथा मध्यप्रदेशच्या माजी उपमुख्यमंत्री उमा भारती यांनी यासंदर्भात ट्विटरच्या सहाय्याने माहिती दिली. त्या राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमाच्या वेळी अयोध्येतच असतील. मात्र, भूमिपूजन कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत. यावेळी त्या शरयू नदीच्या तिरावर असतील. राम मंदिर आंदोलनात उमाभारती यांची महत्वाची भूमिका होती.
यासंदर्भात उमा भारती यांनी, अयोध्येतील रामजन्मभूमी न्यासचे वरिष्ठ अधिकारी आणि पंतप्रधान कार्यालयालाही माहिती दिली आहे. तसेच नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी उपस्थित राहणाऱ्या पाहुन्यांच्या यादीतून आपले नाव वगळावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमिपूनज करत असताना, उमा भारती शरयू नदिच्या काठावर प्रार्थना करतील. भूमिपूजन कार्यक्रमात भाग न घेण्यामागे त्यांनी कोरोना व्हायरसचे कारण सांगितले आहे. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह आणि भाजप नेते स्वतंत्रदेव सिंह यांच्यासह इतर काही नेत्यांना कोरोनाचे सक्रमण झाले आहे. यामुळे आपण चिंतित आहोत, असे उमा भारती यांनी म्हटले आहे.
उमा भारती यांनी ट्विट केले आहे, की काल जेव्हापासून, अमित शाह तसेच यूपी भाजपाच्या नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचे ऐकले, तेव्हापासून मी अयोध्येत मंदिर भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या लोकांसाठी विशेष करून पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी चिंतित आहे. यामुळेच मी, रामजन्मभूमी न्यासच्या अधिकाऱ्यांना सुचना दिली, भूमिपूजन कार्यक्रमावेळी मी अयोध्येत शरयू नदिच्या काठावर असेल. एवढेच नाही, तर पंतप्रधान मोदी आणि इतर लोक गेल्यानंतर आपण रामललाचे दर्शन घेऊ, असेही उमा भारती यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
Happy Friendship Day: इस्रायलनं 'हे' खास बॉलीवुड सॉंग ट्विट करत भारताला दिल्या शुभेच्छा
'या' 3 सरकारी बँकांचे होणार खासगीकरण? नीती आयोगाचा सरकारला सल्ला
तंबाखूपासून तयार केली कोरोना लस? मानवी चाचणीसाठी मागितली परवानगी...
100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर
युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'कोब्रा', खांबाला धरून काढावी लागली अख्खी रात्र; मग...