अयोध्या- रामजन्मभूमी परिसरापासून काही अंतरावरच असलेल्या मुहल्ला बाग बिजेसीच्या ज्या जमिनीच्या खरेदीसंदर्भात रविवारी सपा नेते तथा राज्य सरकारचे माजी मंत्री तेजनारायण पांडेय पवन यांनी घोटाळ्याचा आरोप केला होता, त्याची हवा केवळ 24 तासांच्या आतच निघायला सुरुवात झाली आहे. सपा नेत्याच्या आरोपाचा मुख्य आधार असा होता, की यावर्ष 18 मार्चला ज्या जमिनीचे तीर्थ क्षेत्र ट्रस्टने 18.50 कोटी रुपयांत रजिस्टर्ड अॅग्रीमेंट केले, त्या जमिनीचे अॅग्रीमेंट करणारे रविमोहन तिवारी आणि सुल्तान अंसारी यांनी त्याच तारखेला 10 मिनिटांपूर्वीच केवळ दोन कोटी रुपयांत विक्रीसंदर्भात लेखी करार (sell deed) केला.
हे सांगतानाच माजी मंत्र्यांनी आरोप केला होता, की दोन कोटी रुपयांची जमीन 18.50 कोटी रुपयांत अॅग्रीमेंट करताना कोट्यवधींचा घोटाळा झाला आहे. मात्र, सत्य असे आहे, की संबंधित जमिनीचे चार मार्च 2011 रोजीच म्हणजे 10 वर्षांपूर्वीच मो. इरफान, हरिदास तथा कुसूम पाठक यांनी दोन कोटी रुपयांत रजिस्टर्ड अॅग्रीमेंट केले होते. तीन वर्षांपूर्वी या अॅग्रीमेंटचे नुतनीकरणही करण्यात आले. 2017 मध्ये हरिदास तथा कुसूम पाठक यांनी जमिनीचे मालक नूर आलम, महफूज आलम आणि जावेद आलम यांच्याकडून या जमिनीचा लेखी करार केला आणि हरिदास व कुसूम पाठक यांच्याकडून ही जमीन 17 सप्टेंबर 2019 रोजी रविमोहन तिवारी, सुल्तान अंसारी आदी आठ लोकांनी अॅग्रीमेंट करून घेतली. तसेच रविमोहन तथा सुल्तान अंसारी यांनीच या जमिनीचा 18 मार्चला विक्रीसंदर्भात लेखी करार (sell deed) केला.
अयोध्येत राम मंदिराच्या कामाला गती, RCC तंत्रज्ञानाने होतेय पायाभरणी
माजी मंत्री, जी जमीन दोन कोटी रुपयांची सांगून, ती 18.50 कोटी रुपयांत विकत घेण्यावर आक्षेप घेत आहेत, तिचा ठरलेला भाव चार हजार आठशे रुपये चौरस मीटरने देखील त्याची किंमत पाच कोटी 79 लाख 84 हजारपर्यंत जाते. तर बाग बिजेसी तथा रामनगरीच्या जवळपसच्या जमिनीचा सध्याचा सरासरी भाव दो हजार रुपये चौरस फूट आहे आणि याचा विचार करता, ट्रस्टने संबंधित जमिनीसाठी सरासही किंमतीपेक्षाही अत्यंत कमी किंमत मोजली आहे. संबंधीत जमिनीचे क्षेत्रफळ 12 हजार 80 चौरस मीटर, म्हणजेच एक लाख 29 हजार 981 चौरस फूट आहे. आणि या हिशेबाने ट्रस्टने 1423 रुपये चौरस फूट प्रमाणे जमिनीसाठी पैसे मोजले आहेत.
संत मंडळींत आक्रोश, असे आरोप म्हणजे कट-कारस्थान - रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर माजी मंत्र्याने तथा सपा नेत्याने केलेल्या आरोपांमुळे साधू-संत संतापले आहेत. रामललाचे मुख्य आचार्य सत्येंद्रदास म्हणाले, अशा प्रकारचे आरोप करण्यासाठी लोक स्वतंत्र आहेत आणि त्यांच्या समाधानासाठी चौकशीही केली जाऊ शकते. मात्र, ट्रस्टचा प्रामाणिकपणा आणि रामललांच्या प्रति असलेल्या निष्ठेवर प्रश्न उपस्थित करणे चुकीचे आहे.
राम मंदिरासाठी खरेदी केलेल्या जमीन व्यवहारात घोटाळा?; अवघ्या १० मिनिटांत २ कोटींचे झाले १८ कोटी
कुणाचीही फसवणूक झालेली नाही - सुल्तानट्रस्टच्या नावने संबंधित जमिनीचे रजिस्टर्ड अॅग्रीमेंट करणारे सुल्तान अंसारी म्हणाले, संबंधित जमिनीच्या विक्रीत ना आम्ही ना ट्रस्टने कसल्याही प्रकारची फसवणूक केली. घोटाळ्यांचा आरोप करणारे, अनावश्यक बडबड करत आहेत. सत्य, असे आहे, की दहा वर्षांपूर्वी अयोध्येत जमीनीची किंम्मत अत्यंत कमी होती, तेव्हाच आम्ही दोन कोटी रुपयांत संबंधित जमिनीचे अॅग्रीमेंट केले होते. तीर्थ क्षेत्राला दिलेल्या जमिनीत घोटाळा करण्यात आला, असे म्हणणे चुकीचे आहे. खरे तर राम मंदिरासाठी सहकार्याची भावना मनात ठेवून या जमिनीचे बाजार भावापेक्षाही खूप कमी किंमती अॅग्रीमेंट करण्यात आले आहे.