अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराच्या (Ram Mandir in Ayodhya) उभारणीला लवकरच सुरुवात होणार आहे. ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत भूमिपूजन करतील. त्यानंतर मंदिराची उभारणी सुरू होईल. अयोध्येत उभारण्यात येणारं राम मंदिर अनेकार्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. या मंदिराचं बांधकाम केलं जात असताना जमिनीपासून २ हजार फूट खाली एक कॅप्सूल ठेवण्यात येणार असल्याची माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमधल्या एका सदस्यानं दिली आहे. राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात करताना जमिनीपासून २ हजार फूट खाली एक कॅप्सुल ठेवण्यात येईल, असं श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य असलेल्या कामेश्वर चौपाल यांनी सांगितलं. भविष्यात एखाद्याला मंदिराच्या इतिहासाचा अभ्यास करायचा झाल्यास त्याला त्या कॅप्सुलची मदत होईल. त्याला राम जन्मभूमीबद्दलचा महत्त्वपूर्ण तपशील त्यातून मिळेल, अशी माहिती त्यांनी दिली.
Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिराच्या २ हजार फूट खाली ठेवली जाणार 'टाईम कॅप्सूल'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 10:56 PM