नवी दिल्ली : अयोध्या, वाराणसी आणि मथुरा या धार्मिक स्थळी अतिरेक्यांकडून हल्ले होण्याची शक्यता गुप्तचर संस्थांनी गुप्त माहितीच्या आधारावर व्यक्त केल्याचे पाहता या तीनही शहरांमध्ये चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.केंद्रीय गृहसचिव अनिल गोस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) पोलीस महासंचालक दिलीप त्रिवेदी, उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक ए.एल. बॅनर्जी, प्रधान सचिव (गृह) दीपक सिंग सिंघल आणि अन्य वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. या धार्मिक स्थळांवर नव्या अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणेचा अवलंब केला जाणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे आणि अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे उपयोगात आणली जातील. (लोकमत न्यूज नेटवर्क)
अयोध्या, वाराणसी, मथुरा अतिरेक्यांचे ‘टार्गेट’
By admin | Published: June 13, 2014 3:26 AM