शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
2
पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
3
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
4
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
5
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
6
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
7
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
8
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
9
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
10
पत्नी, वडिलांचा अपमान करणाऱ्याचा काढला काटा, पनवेलमधील घटना, उत्तर प्रदेशातून १ अटकेत
11
मार्गिकांसाठी आता वांद्रे-खार पादचारी पूल तोडणार, पश्चिम रेल्वेवरील हार्बरचे वेळापत्रक ६ महिने विस्कळीत राहणार
12
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
13
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
14
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
15
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
17
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
18
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
19
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
20
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा

अयोध्याप्रकरणी लगेच सुनावणीची याचिका फेटाळली; पूजेचा हक्क हवा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2018 5:56 AM

अयोध्येतील वादग्रस्त राम मंदिरात पूजेचा माझा मूलभूत अधिकार वापरता यावा या मागणीच्या भाजपाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला.

नवी दिल्ली : अयोध्येतील वादग्रस्त राम मंदिरात पूजेचा माझा मूलभूत अधिकार वापरता यावा या मागणीच्या भाजपाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि ए. एम. खानविलकर यांच्या खंडपीठाने स्वामी यांना या मुद्द्याचा तुम्ही नंतर उल्लेख करा, असे म्हटले.स्वामी म्हणाले की, ‘नंतर’ हा शब्द खूपच व्यक्तिनिष्ठ असून मी माझी याचिका सुनावणीस घ्या, असे पुन्हा १५ दिवसांनी म्हणेन. पूजा करण्याचा मूलभूत अधिकार बजावता यावा या मागणीवर तातडीने सुनावणी करावी ही स्वामी यांची याचिका न्यायालयाने याआधीही फेटाळली होती. १४ मार्च रोजी विशेष खंडपीठाने चित्रपट दिग्दर्शक शाम बेनेगल व तिस्ता सेटलवाड यांनी अयोध्येतील जमिनीच्या वादात हस्तक्षेप करण्याची याचिका फेटाळली होती. मूळ खटल्यात पक्षकारांनाच फक्त लढता येईल, असेही या खंडपीठाने स्पष्ट केले होते. स्वामी यांच्याच विनंतीवरून हे खटले जलदगती न्यायालयात सुरू आहेत. मुख्य खटल्यात हस्तक्षेपास स्वामी यांनाही न्यायालयाने परवानगी दिली नव्हती. पण खंडपीठाने स्वामी यांचे त्यांना या खटल्यात हस्तक्षेप करायचा नाही हे म्हणणे विचारात घेतले. (वृत्तसंस्था)मालमत्तेपेक्षा पूजेचा अधिकार महत्त्वाचामंदिरात पूजा करण्याचा माझा मूलभूत अधिकार वापरता यावा या मागणीची मी स्वतंत्र याचिका केली होती. पूजेचा अधिकार हा माझा मूलभूत असून तो मालमत्तेच्या अधिकारापेक्षाही मोठा आहे, असे स्वामी याचिकेत म्हणाले होते.

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीCourtन्यायालय