अस्तित्व परिषदेचा विजयआयुर्वेद डॉक्टरांची प्रॅक्टीस अबाधित रहावी यासाठी अस्तित्व परिषदेच्या माध्यमातून लढा उभारण्यात आला होता. या लढ्याला यश आले आहे. कोर्टात बाजू मांडण्यासाठी अस्तित्व परिषदेने खंबीर लढा दिला. नेते नारायण राणे परिषदेच्या बाजूने उभे राहिले, तर राज्य अध्यक्ष डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी कठोर परिश्रम घेतले. यामुळे हा त्यांच्या कार्याचा आणि परिषदेच्या पाठबळाचा विजय आहे. - डॉ. संदीप कोतवाल, राज्य संघटक, अस्तित्व परिषद, नाशिक.लढ्याचे यशहोमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथीच्या परवानगीसाठी अन्याय निवारण संघटना उभारण्यात आली होती, २०१३ मध्ये आंदोलन करण्यात आले, सलग बारा दिवस उपोषण करण्यात आले. विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला होता. डॉ. रजनी इंदूरकर, डॉ. सोमनाथ गोसावी यांचे सहकार्य मोलाचे ठरले.- डॉ. अरुण भस्मे, होमिओपॅथी चळवळीचे नेते. बीड.कायद्याचा मिळाला आधारसर्वोच्च न्यायालयाने आयएमएचे अपील फेटाळल्यामुळे आयुर्वेद डॉक्टरांना दिलासा मिळाला आहे. आयुर्वेदाच्या रजिस्टर्ड डॉक्टरांना ॲलोपॅथीची प्रॅक्टीस करण्याची परवानगी राज्य शासनाने एका अद्यादेशान्वये बहाल केली होती. त्या विरोधात आयएमएने न्यायालयात धाव घेतली होती. परंतु आता न्यायालयाने स्थगितीची याचिका फेटाळल्यामुळे शासनाच्या अद्यादेशाला बळ प्राप्त झाले आहे. -डॉ. सतीश डंुंबरे, आयुर्वेद विद्याशाखा, अधिष्ठाता. आरोग्य विद्यापीठ.
आयुर्वेद, होमिओपॅथी डॉक्टरांची प्रॅक्टीस अबाधित प्रतिक्रिया
By admin | Published: July 09, 2015 11:21 PM