शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
2
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
3
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
4
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
5
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
6
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
7
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
8
Maharashtra Election 2024 Live Updates: महाराष्ट्राची निवडणूक ही विचारसरणीची निवडणूक- राहुल गांधी
9
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
10
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
11
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
12
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
13
Sankashti Chaturthi 2024: तुमचा आज संकष्टीचा उपास आहे? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि नियम!
14
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
16
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
18
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
19
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
20
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर

आयुष्यमान भारत योजना देशाची फसवणूक, काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 5:03 AM

मोफत आरोग्य सेवा देण्याचा निवडणूक वायदा करणारी मोदी सरकारची आयुष्यमान भारत योजना म्हणजे सर्वांत मोठी फसवणूक असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या योजनेची सत्यता लोकांसमोर आणण्यासाठी काँग्रेस मोहीम चालविणार आहे.

नवी दिल्ली - मोफत आरोग्य सेवा देण्याचा निवडणूक वायदा करणारी मोदी सरकारची आयुष्यमान भारत योजना म्हणजे सर्वांत मोठी फसवणूक असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या योजनेची सत्यता लोकांसमोर आणण्यासाठी काँग्रेस मोहीम चालविणार आहे.काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सांगितले की, खाजगी रुग्णालये आणि विमा कंपन्यांना लाभ मिळवून देण्यासाठी मोदी सरकारने ही योजना आखली आहे. ५0 कोटी लाभार्थ्यांसह ही जगातील सर्वांत मोठी योजना असल्याचा दावा खोटा आहे. काँग्रेसने महाराष्ट्रात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना राबविली होती. यात २.३ कोटी परिवारांना सामावून घेण्यात आले होते. हीच योजना आता ज्योतिबा फुले यांच्या नावे चालविली जाते. पीएमजेएवाय योजनेत यातील ८४ लाख लोकांनाच सामावून घेण्यात आले. विमा संरक्षण असलेल्यांना २२ टक्केच प्रीमियम देण्यात आला आहे.काँग्रेसने म्हटले की, मोदी केअरच्या नावाने चालविण्यात येणाऱ्या पीएमजेएवाय योजनेत खाजगी रुग्णालयांनी घोटाळा केल्यास केवळ संलग्नता रद्द करण्याची शिक्षा ठेवण्यात आली आहे. ज्या खाजगी रुग्णालयांना सरकार लाभ मिळवून देऊ इच्छिते त्यांना आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी घोटाळ्याला किरकोळ शिक्षा ठेवली गेली आहे.काँग्रेसने म्हटले की, या योजनेची आकडेवारी लपवून ठेवण्यासाठी या योजनेला माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले आहे. योजनेत सहभागी खाजगी रुग्णालये आणि खाजगी विमा कंपन्यांसाठी ठेवण्यात आलेल्या अटी व शर्तींचे दस्तावेज काँग्रेसने पत्रकारांना सादर केले आहेत.

टॅग्स :ayushman bharatआयुष्मान भारतNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस