लखनऊः समाजवादी पार्टीचे नेते आणि खासदार आझम खान यांच्या पुत्राला रामपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अब्दुल्लाला जोहर युनिव्हर्सिटीमधल्या तपासणीदरम्यान ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलीस जोहर युनिव्हर्सिटीत चोरी झालेल्या पुस्तकांची चौकशी करत आहे. अब्दुल्ला यानं पोलिसांच्या कारवाईत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. अब्दुल्लावर मंगळवारी बोगस जन्म प्रमाणपत्र सादर करून पासपोर्ड मिळवल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आलं आहे. रिपोर्ट्सनुसार, पोलीस जोहर युनिव्हर्सिटीतल्या पुस्तकांच्या चोरी प्रकरणात छापेमारी केली होती. युनिव्हर्सिटीच्या विरोधात स्थानिक मदरशानं तक्रार दाखल केली होती. मोठ्या संस्थेनं हस्तलिखित आणि जुनी पुस्तकं या युनिव्हर्सिटीनं मदरशातून चोरली होती. या प्रकरणात 16 जून रोजी एफआयआर दाखल करण्यात आलं होतं. हे पुस्तक जोहर युनिव्हर्सिटीतलं आहे.पोलिसांनी छापा टाकल्यानंतर इथून 100हून अधिक पुस्तकं जप्त करण्यात आली होती. त्यानंतर या छापा प्रक्रियेत अब्दुल्लानं हस्तक्षेप केला. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. परंतु त्यांना अटक करण्यात आली आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
आझम खान यांचा पुत्र अब्दुल्ला पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 3:21 PM