उत्तर प्रदेशच्या आझमगढ (Azamgarh) जनपदच्या दिवाणी कोर्टाबाहेरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती महिलांना मारहाण करताना स्पष्टपणे दिसत आहे. यावेळी पोलीस होमगार्ड हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण संतापलेला पुरूष आणि महिला आउट ऑफ कंट्रोल होऊन एकमेकांवर हल्ला करत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हिडीओत पिवळ्या रंगाी साडी नेसलेल्या महिलेचं लग्न ६ वर्षांआधी झालं होतं. लग्नाच्या काही दिवसांनंतरच पती तिला सोडून गेला होता. बराच शोध घेऊनही त्याचा काही पत्ता लागला नव्हता. दरम्यान महिलेने एका बाळालाही जन्म दिला. हे बाळ आता ५ वर्षांचं झालं.
नंतर विवाहितेला समजलं की, पतीने घरातून पळून जाऊन दुसऱ्या महिलेसोबत लग्न केलं आहे. गेल्या शुक्रवारी महिला आणि तिच्या कुटुंबियांना माहिती मिळाली की, पती कोर्टात आला आहे. विवाहित आपल्या मुलीला घेऊन आणि सोबत कुटुंबियांना घेऊन कोर्टात पोहोचली. जिथे पतीसोबत असलेल्या एका दुसऱ्या व्यक्तीने या महिलेवर हल्ला केला. याचा व्हिडीओ आजूबाजूच्या लोकांनी रेकॉर्ड केला.
व्हिडीओ ते बोलताना दिसत आहेत की, पतीने दुसरं केलं म्हणून महिला आणि तिच्या मुलीचं आता काय होणार? त्यावरूनच हा हायव्होल्टेज ड्रामा झाला. आता या या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सध्या यावर पोलिसांकडून काहीही उत्तर आलेलं नाही.