हैदराबाद: देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं घट होत आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात दररोज ४ लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद व्हायची. आता हाच आकडा सव्वा लाखांवर आला आहे. मात्र आता कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आल्यानं चिंता वाढली आहे. तेलंगणातील अनेक नमुन्यांमध्ये SARS-CoV-2 चा B.1.525 व्हेरिएंट आढळून आला आहे. तेलंगणा महाराष्ट्राचं शेजारी राज्य असल्यानं ही धोक्याची घंटा आहे.तेलंगणात आढळून आलेला व्हेरिएंट या वर्षी फेब्रुवारीत युनायटेड किंग्डममध्ये आढळून आला. त्याचा संबंध नायजेरियाशी आहे. B.1.525 व्हेरिएंटची लागण झालेले रुग्ण ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, अमेरिकेसह अनेक देशांमध्ये आढळून आले आहेत. एप्रिल आणि मेमध्ये तपासण्यात आलेल्या नमुन्यांपैकी २२ मध्ये B.1.525 व्हेरिएंट सापडला. यापैकी १६ नमुने एकट्या तेलंगणातील होते. 'हा व्हेरिएंट आतापर्यंत जवळपास ५० देशांमध्ये आढळून आला आहे. एकाच परिसरात व्हेरिएंटचे इतके नमुने मिळत असल्यास या ट्रेंडकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायला हवं,' असं जीनोम सिक्वेन्सिंगशी संबंधित एका वरिष्ठ तज्ज्ञानं सांगितलं.दिवसभरात देशात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा दुप्पट रुग्ण बरे झाले, मृतांचे प्रमाणही घटलेजागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) च्या GISAID डेटानुसार, मेमध्ये तेलंगणातून B.1.525 चे ३ नमुने मिळाले. तर एप्रिलमध्ये देशभरात १९ नमुने आढळून आले. यापैकी १३ तेलंगणातील होते. B.1.525 व्हेरिएंट बऱ्याच अंशी दक्षिण आफ्रिकन व्हेरिएंटशी मिळता जुळता आहे. अमेरिकन सेंटर फॉर डिजीज कंट्रोलनं (सीडीसी) दिलेल्या माहितीनुसार, या व्हेरिएंटच्या स्पाईक प्रोटिनमध्ये म्युटेशन्स दिसून आले आहेत. 'हा व्हेरिएंट अँटिबॉडी उपचारांचा प्रभाव कमी करतो. याशिवाय यावर लसीकरण आणि कॉन्व्लसेंट प्लाझ्मादेखील फारसं प्रभावी ठरत नाही. या व्हेरिएंटबद्दल शास्त्रज्ञांकडे अद्याप फारशी माहिती नाही. अनेक देशांमध्ये यावर संशोधन सुरू आहे,' अशी माहिती सीडीसीनं दिली.
CoronaVirus News: ...तर कोरोना लस, अँटिबॉडीजचा उपयोग शून्य; महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2021 11:22 AM