नवी दिल्ली- कोरोना काळातच चर्चेत आलेल्या ‘बाबा का ढाबा’चे मालक कांता प्रसाद (kanta prasad) यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. दिल्लीतील मालवीय नगर भागात राहणाऱ्या कांता प्रसाद यांनी दारू पिऊन झोपेच्या गोळ्या घेतल्या आणि आत्महत्येचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी रात्री साधारणपणे दहा वाजताच्या सुमारास घडली. (Baba ka dhaba kanta prasad attempted to commit suicide in dehli)
कांता प्रसाद यांना रात्री उशिरा दिल्ली येथील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता बाबा कांता प्रसाद धोक्याच्या बाहेर आहेत. यासंदर्भात पोलिसांना रुग्णालयाकडूनच माहिती मिळाली.
गौरवने नुकतीच घेतली होती बाबांची भेट - यूट्यूबर गौरव वासनने नुकतीच पुन्हा एकदा कांता प्रसाद यांची भेट घेतली होती आणि बाबांसोबतचे समज-गैरसमज दूर केले होते. बाबांनी गौरववर केलेल्या आरोपांनंतर मोठ्या प्रमाणावर लोकांनी 'बाबा का ढाबा'वर जाणे बंद केले होते. यानंतर कांता प्रसाद यांनी माफीही मागितली होती.
Baba Ka Dhaba: "गौरव वासन… तो मुलगा काही चोर नव्हता, ना आम्ही..."; बाबांनी मागितली यूट्यूबरची माफी
माफी मागताना काय म्हणाले होते बाबा -सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, ‘गौरव वासन… तो मुलगा काही चोर नव्हता, ना आम्ही कधी त्याला चोर म्हटले आहे. आमच्याकडून एक चूक झाली आहे, यासाठी आम्ही क्षमा मागतो आणि जनतेला म्हणत आहोत, की जर काही चुकल असेल तर आम्हाला माफ करा.’
बाबा रातो-रात झाले होते स्टार -दिल्लीतील मालवीय नगर येथे ढाबा चलवणारे कांता प्रसाद हे गेल्या वर्षी अचानकच चर्चेत आले होते. यू-ट्यूबर गौरवने त्यांच्या ढाब्याचा व्हिडिओ तयार केला होता. यानंतर त्यांच्या ढाब्याची विक्री मोठ्या प्रमाणावर वाढली होती आणि कांता प्रसाद रातो-रात स्टार झाले होते.
Baba Ka Dhaba: पहिल्या लॉकडाऊनने भरभरून दिले, दुसऱ्याने काढून घेतले; बाबा का ढाबा बंद झाला
मात्र, यानंतर कांताप्रसाद यांनी गौरववर फसवणुकीचा आरोप केला होता. यानंतर लॉकडाऊन लागल्याने कांता प्रसाद यांच्या कामावरही त्याचा मोठा परिणाम झाला होता. 'बाबा का ढाबा' शिवाय सुरू केलेले आणखी एक रेस्टॉरंटदेखील यादरम्यान बंद पडले.