नवी दिल्ली: योगगुरू बाबा रामदेव आणि इंडियन मेडिकल असोसिएशनमधील वाद शमताना दिसत नाहीये. अॅलोपॅथी उपचार पद्धतींवर बाबा रामदेव यांनी केलेल्या गंभीर टीकेनंतर संमिश्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. आता तर सन २०१२ मध्ये केलेल्या एका ट्विटवरून नेटकऱ्यांनी बाबा रामदेव यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला आहे. बाबा रामदेव यांचे हे ट्विट व्हायरल झाले असून, आमचे पैसे कुठे आहेत, अशी विचारणा आता नेटिझन्सकडून केली जात आहे. (baba ramdev black money tweet gone viral and users asked where is our money)
बाबा रामदेव यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनवर केलेल्या आरोपानंतर आता बाबा रामदेव यांच्यावर विविध स्तरांतून टीका केली जात आहे. तसेच सन २०१२ मधील एक ट्विट व्हायरल झाले असून, ट्विटर युझर्स त्यावर अनेक प्रश्न विचारत आहेत. ‘काळा पैसा देशात परत आला, तर पेट्रोल ३० रुपयांना मिळेल’, असे त्या ट्विटमध्ये म्हटले होते.
“कोणत्या रुग्णालयात उपचारांसाठी पतंजलीचे औषध दिले”; IMA चे बाबा रामदेव यांना चॅलेंज
३० रुपयांचे पेट्रोल १०० रुपये झाले आहे
बाबा रामदेव यांच्या ट्विटवर हंसराज मीणा यांनी प्रतिक्रिया देत, कुठे आहे काळा पैसा, तर अभिनव शर्मा म्हणतात की, ३० रुपयांचे पेट्रोल १०० रुपये झाले आहे, आणखी किती काळा पैसा आणणार आहात? तर, दिनेश शर्मा यांनी म्हटले आहे की, पतंजली सरसों तेल आता १५५ रुपये झाले आहे आणि काळा पैसा नकोय. दुसरीकडे मनिष तिवारी म्हणतात की, ना काळा पैसा देशात परत येणार, ना पेट्रोल ३० रुपयांना मिळणार.
बाबा रामदेव यांना चर्चेसाठी आव्हान
योगगुरू बाबा रामदेव यांनी कोणत्या अॅलोपॅथी रुग्णालयामध्ये पतंजलींचे औषध उपचारांसाठी दिले आहे, अशी विचारणा करत सार्वजनिक चर्चेसाठी बाबा रामदेव यांनी पॅनलसमोर उपस्थित व्हावे, असे आव्हान ‘IMA उत्तराखंड’ यांनी दिले आहे. एका कार्यक्रमावेळी बाबा रामदेव यांनी कोरोनावरील उपचारासाठी अॅलोपॅथी रुग्णालयात पतंजलीची औषधे वापरली जात असल्याचा दावा केला होता. यानंतर ‘IMA उत्तराखंड’ ने कोरोनाच्या उपचारासाठी कोणत्या रुग्णालयाला पतंजलीचे औषध दिले, असा प्रतिप्रश्न केला आहे.
“सत्तेसाठी मती गेली... आम्ही अजूनही हिंदुत्व सोडले नाही, असे आता कोडगेपणाने सांगू नका”
दरम्यान, आमची कुठल्याही पॅथीसोबत कॉम्पिटिशन नाही, विरोध नाही. आकस्मिक स्थितीत अॅलोपॅथी उपचार आवश्यक असल्याचेही आपण मानतो, मान्यताही देतो. पण याचा अर्थ असा नाही, की केवळ हीच उपचार पद्धती आहे. अॅलोपॅथिक उपचार पद्धतीवर निशाणासाधत ते म्हणाले, आम्ही मानतो, की आपल्याकडे लाइफ सेव्हिंग ड्रग्स आणि अॅडव्हान्स सर्जरी आहे. पण आपल्याकडे या दोन गोष्टी असतील, तर आमच्याकडे 98 गोष्टी आहेत. आयुर्वेद आणि निसर्गोपचार सर्जरी न करता आणि औषध न घेताच उत्तम आरोग्य देते. आणि एक हजाराहून अधिक व्याधींवर इलाज करते, असा दावाही बाबा रामदेव यांनी केला.