Baba Ramdev : योगगुरू बाबा रामदेव यांची पतंजली कंपनी देशासह विदेशातही आपला व्यवसाय करते. यामुळे बाबा रामदेव यांच्यावर अनेकदा योगगुरू नसून, बिझनेसमॅन असल्याचा आरोप लागत असतो. यावर आता स्वतः रामदेव स्वष्ट बोलले आहेत. साहित्य आजतकच्या मंचावर त्यांनी स्पष्टपमे सांगितले की, त्यांनी देशाऐवजी व्यवसायाचा विचार केला असता, तर आज ते उद्योगपती इलॉन मस्कपेक्षा श्रीमंत झाले असते.
यावेळी आपल्या जुन्या विधानाचा संदर्भ देत बाबा रामदेव म्हणाले की, 'मी एकदा म्हटले होते की, टाटा बिर्ला, अदानी, झुकरबर्ग, इलॉन मस्क, वॉरेन बफे आणि बिल गेट्स यांच्यापेक्षा स्वामी रामदेवची वेळ महत्वाची आहे. ते सर्व स्वतःसाठी जगतात, पण संन्यासी सर्वांसाठी जगतो. म्हणूनच माझा वेळ, शक्ती आणि ज्ञान सर्वांच्या कल्याणासाठी आहे. वेद, पुराण, रामायण, महाभारत, भगवद्गीता आणि पूर्वजांकडून मला मिळालेले ज्ञान मी संशोधन करून सर्वांसमोर ठेवले.'
...तर इलॉन मस्कपेक्षा श्रीमंत झालो असतोइलॉन मस्कचा संदर्भ देत योगगुरू म्हणाले की, 'मस्क म्हणाले होते, अशी कार बनवू इच्छितो, जी तुम्हाला आकाशात जागा राखून ठेवेन. ते तंत्रज्ञानाबद्दल बोलतात. आपल्याकडे वेद, पुराण, धार्मिक ग्रंथ आणि पूर्वजांचे ज्ञान आहे, ते ज्ञान जगाच्या कल्याणासाठी दिले. जर मी या बौद्धिक संपत्तीची पेटंट घेतली असती किंवा देशाऐवजी माझ्या व्यवसायावर जास्त लक्ष दिले असते, तर मी इलॉन मस्कपेक्षा जास्त श्रीमंत झालो अस,' असे ते म्हणाले.
इतिहासाशी छेडछाड... यावेळी त्यांनी भारताच्या इतिहासाशी छेडछाड केल्याचेही म्हटले. रामदेव म्हणाले की, साहित्यात छेडछाड करण्यात आली आहे. इतिहासाच्या पुनर्लेखनाची नव्हे तर पुनर्व्याख्याची गरज आहे. ज्या प्रकारे भारताचा गौरवशाली भूतकाळ आहे, यामध्ये आम्हाला काही संघर्षांचा सामना करावा लागला आहे. भारत 1000 वर्षे गुलाम होता, हे आपण 200 वर्षांपासून वाचत आहोत. पण, भारत गुलाम नव्हता, तो संघर्ष करत होता. आम्ही मुघल किंवा इंग्रजांची सत्ता कधीच मान्य केली नाही, असेही ते म्हणाले.