योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलि आयुर्वेद संस्थेवरही कोरोनाचं संकट कोसळलं आहे. पतंजलिच्या डेअरी व्यवसायाचे सीईओ सुनील बन्सल यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. 'द प्रिंट' या इंग्रजी वृत्तपत्रानं याबाबतचं वृत्त दिलं असून ५७ वर्षीय सुनील यांचं निधन १९ मे रोजी झाल्याचं म्हटलं आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, कोरोनाचं इन्फेक्शन वाढल्यामुळे सुनील बन्सल यांची फुफ्फुसं निकामी झाली होती. त्यासोबत त्यांना ब्रेन हॅमरेजही झाला आणि यातंच त्यांचं निधन झालं. डेअरी विज्ञानात प्राविण्य प्राप्त केलेले सुनील बन्सल यांनी २०१८ साली बाबा रामदेव यांच्या पतंजलि समुहात डेअर विभागाचा कार्यभार हातळण्यास सुरुवात केली होती. बन्सल यांच्याच कार्यकाळात पतंजलिनं पाकिटबंद दूध, दही, छास आणि पनीरसोबत इतर दूग्धजन्य पदार्थ बाजारात आणण्याची घोषणा केली होती. या संपूर्ण विभागाचं काम सुनील बन्सल पाहत होते.
अॅलोपॅथी उपचारांवरील विधानावरुन बाबा रामदेव वादातअॅलोपॅथी उपचारांना बोगस विज्ञान संबोधल्यानंतर बाबा रामदेव चांगलेच वादात सापडले आहेत. संपूर्ण देशभरातून बाबा रामदेव यांच्यावर टीका होत असून केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही बाबा रामदेव यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. ॲलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे. कोरोनावरील उपचारात सर्वप्रथम हायड्रोक्लोरोक्वीन फेल ठरलं. त्यानंतर, प्लाझा थेरपी अन् रेमडेसिविर इंजेक्शनही फेल ठरल्याचं योगगुरू बाबा रामदेव यांनी म्हटलं होतं. संपूर्ण देशभरातून बाबा रामदेव यांच्यावर टीका झाल्यानंतर रविवारी रात्री त्यांनी आपलं विधान मागे घेतलं.