इंदूर : अभिनेत्री दीपिका पदुकोणने सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक मुद्द्यांचे योग्य आकलन करून घेण्यासाठी माझ्यासारखा सल्लागार नियुक्त केला पाहिजे, असा सल्ला योगगुरू रामदेव बाबा यांनी दिला आहे. दरम्यान, दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थ्यांना दीपिका पदुकोणने पाठिंबा दिल्यानंतर सुरू झालेल्या वादानंतर रामदेव बाबा यांनी हे विधान केले आहे.
दीपिका पादुकोणमध्ये अभिनय गुण असणे ही वेगळी गोष्ट आहे. मात्र, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक मुद्द्यांचे ज्ञान आत्मसात करण्यासाठी तिला देशाबद्दल जाणून द्यावे लागेल आणि वाचनही करावे लागेल. हे समजून घेतल्यानंतरच तिने मोठे निर्णय घेतले पाहिजे, असे रामदेव बाबा यांनी सांगितले. तसेच, मला वाटते की अशा प्रकारच्या वादाच्या प्रसंगी योग्य मार्गदर्शन करण्यासाठी दीपिका पादुकोणने माझ्यासारखा एखादा सल्लागार ठेवला पाहिजे, असेही रामदेव बाबा म्हणाले.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (सीएए) जोरदार समर्थन करत रामदेव बाबा म्हणाले, "ज्या लोकांना सीएएचा फुलफॉर्मही माहीत नाही, ते लोक या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत अपशब्दांचा वापर करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, हा कायदा कोणत्याही व्यक्तीचे नागरिकत्व काढून घेण्यासाठी तयार करण्यात आला नसून नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आला आहे. तरीही काही लोक आगी लावण्याचे काम करत आहेत, अशी टीका रामदेव बाबांनी विरोधकांवर केली आहे.
(JNU भेटीचा दीपिका पादुकोणला असाही फटका, वाचा सविस्तर)
याचबरोबर, काही लोक एनआरसीच्या (राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी) नावावर अराजकता पसरवत आहेत. ते जिनांसारखे स्वातंत्र्याच्या घोषणा देत आहेत. आता जिना यांच्यासारख्या घोषणा कोठून आल्या? अशा विरोधांमुळे देशाची आणि देशातील संस्थांची प्रतिमा खराब होत आहे, असे रामदेब बाबा यांनी सांगितले.
दरम्यान, जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर देशभरात ठिकठिकाणी निदर्शने झाली. याचदरम्यान अभिनेत्री दीपिका पादुकोण जेएनयूमध्ये आंदोलक विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी पोहोचली आणि सगळीकडे खळबळ माजली. दीपिका पदुकोणने जेएनयूमध्ये जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला होता. यावेळी तिने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. विद्यार्थ्यांच्या आंदोलनात ती केवळ दहा मिनिटे उपस्थित होती. त्यावरून भाजपाने दीपिकावर टीका केली होती. तसेच, अनेकांनी तिच्या ‘छपाक’ या सिनेमावर बहिष्कार टाकण्याची भाषा केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
'आज के शिवाजी' पुस्तक म्हणजे ढोंग अन् चमचेगिरीचा सर्वोच्च नमुना- शिवसेना
संतप्त शिवप्रेमींच्या तीव्र निदर्शनानंतर ‘आज के शिवाजी’ पुस्तक घेतले मागे
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेलांचं मोठं विधान; म्हणाले, भारतात जे घडतंय ते अतिशय दु:खद
मोदी-शाह-डोवालांच्या फोटोंवर क्रॉस, प्रज्ञा सिंह ठाकूरांना मिळाले संशयित पत्र