शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

IMA Vs Ramdev: “माझी लढाई डॉक्टर्स आणि अॅलोपॅथीविरोधात नाही, तर...”; बाबा रामदेव यांनी केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 10:20 PM

IMA Vs Ramdev: योगगुरू बाबा रामदेव यांनी ट्विटरवरून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

ठळक मुद्देमाझी लढाई डॉक्टर्स आणि अॅलोपॅथीविरोधात नाहीअ‍ॅलोपॅथीत शस्त्रक्रिया आणि जीव वाचवण्याची औषधेबाबा रामदेव यांनी केले स्पष्ट

नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली असताना दुसरीकडे मात्र अॅलोपॅथी आणि आयुर्वेद या उपचार पद्धतीवरून देशात नवा वाद रंगताना पाहायला मिळत आहे. योगगुरू बाबा रामदेव यांनी केलेल्या आरोप आणि विधानानंतर १ जून रोजी संपूर्ण देशात काळा दिवस पाळण्याचे फेडरेशन ऑफ रेजिडेंट डॉक्टर्स असोसिएशन इंडिया जाहीर केले आहे. यातच आता बाबा रामदेव यांनी देशातील सर्व डॉक्टरांना प्रणाम करतो. कोरोना संकटाच्या काळात त्यांनी हजारो रुग्णांचे प्राण वाचवले, असे म्हटत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (baba ramdev says i am not against ima and doctors and have already taken my words back)

IMA आणि बाबा रामदेव यांच्यातील वाद वाढल्याचे पाहायला मिळत आहे. योगगुरु रामदेव यांनी अ‍ॅलोपॅथी आणि डॉक्टरांवर टीकास्त्र सोडले. या टीकेनंतर आयएमएने केंद्रीय आरोग्यमंत्र्यांपासून पंतप्रधानांपर्यंत याची दखल घेण्यास सांगितले असून, बाबा रामदेव यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मात्र, यानंतर माझे वक्तव्य मागे घेत आहे. कोरोना संकटाच्या कालावधीत डॉक्टरांनी रुग्णांची सेवा केली आहे. आपल्या त्यागातून रुग्णांना जीवनदान दिले आहे. त्या सर्व डॉक्टरांना मी प्रणाम करतो, असे सांगत ट्विटरच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

 

माझी लढाई डॉक्टर्स आणि अॅलोपॅथीविरोधात नाही

माझी लढाई डॉक्टर्स आणि अॅलोपॅथीविरोधात नाही. आयएमएविरोधात जाण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र आमचा या क्षेत्रातील माफियांना विरोध आहे. ते दोन रुपयांचं औषध दोन हजार रुपयांना विकत आहेत. तसेच आवश्यकता नसताना ऑपरेशन आणि चाचणी करण्याचा सल्ला देत आहेत. तसेच औषधांचा धंदा करतात. आम्ही हा वाद संपवू इच्छित आहे, असे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. 

बापरे! टिकटॉक व्हिडिओ बनवण्यासाठी नदीत घेतली उडी; बचाव पथकाद्वारे बुडलेल्याचा शोध सुरू

अ‍ॅलोपॅथीत शस्त्रक्रिया आणि जीव वाचवण्याची औषधे

दुसऱ्या एका ट्विटमध्ये बाबा रामदेव यांनी म्हटले आहे की, जर अ‍ॅलोपॅथीत शस्त्रक्रिया आणि जीव वाचवण्याची औषधं आहेत. तर ९८ टक्के आजारांना योग आणि आयुर्वेदमध्ये समाधान आहे. योग-आयुर्वेद यांना स्यूडो सायन्स आणि अल्टरनेटिव थेरपी बोलणं खिल्ली उडवण्यासारखं आहे. ही मानसिकता देश सहन करणार नाही, असे बाबा रामदेव यांनी सांगितले. 

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाpatanjaliपतंजली