सर्वोदय महिला उपासक संघातर्फे बाबासाहेबांना अभिवादन
By admin | Published: December 07, 2015 12:02 AM
इगतपुरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथील सवार्ेदय महिला उपासक संघाने चैत्यभूमीकडे जाणार्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यात प्रवास करणार्यांना इगतपुरी रेल्वेस्थानकात अन्नदान केले. डॉ. आंबेडकरनगर येथील सवार्ेदय बुद्धविहारातील बुद्ध उपासक एस. के. डांगळे यांनी बुद्धवंदना घेऊन डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.
इगतपुरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथील सवार्ेदय महिला उपासक संघाने चैत्यभूमीकडे जाणार्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यात प्रवास करणार्यांना इगतपुरी रेल्वेस्थानकात अन्नदान केले. डॉ. आंबेडकरनगर येथील सवार्ेदय बुद्धविहारातील बुद्ध उपासक एस. के. डांगळे यांनी बुद्धवंदना घेऊन डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. बौद्ध विहारात लहान मुलांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचाराची प्रेरणात्मक भाषणे केली. भारतीय राज्यघटनेमुळे देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे पण राज्यकर्त्यांनी घटनेप्रमाणे आचरण केले पाहिजे असे मत सामाजिक कार्यकर्ता प्रल्हाद जाधव यांनी यावेळी व्यक्त केले. महिलांनी शिक्षित होऊन समाजात आदर्श निर्माण करावा, म्हणजेच खर्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची क्र ांती घडून येईल, असे वीज वितरण विभागाच्या अभियंत्या वैशाली खरात यावेळी म्हणाल्या. यावेळी वैशाली खरात ,शोभा पगारे ,सुशीलाबाई डांगळे ,छाया शिंदे ,अशा भडांगे ,राधाबाई जगताप ,चंदुबाई खरात ,इंदुबाई गांगुर्डे ,भीमाबाई भालेराव, उपासक एस . के . डांगळे , गोरख बोडके ,प्रल्हाद जाधव ,श्रीकृष्ण वारूंगसे ,डॉ .श्रीराम लहामटे, संविधान भडांगे ,अस्लेशा दोंदे ,सृती शेळके ,दक्षता गांगुर्डे, प्रणाली जाधव आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन सिमा जाधव यांनी केले. यावेळी संविधान वाचन व प्रतिज्ञा वाचन करून कार्यकमाची सांगता झाली. (वार्ताहर) ( फोटो ओळ) सवार्ेदय बुद्ध विहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतांना महिला उपासीका व उपासक एस . के . डांगळे , गोरख बोडके ,प्रल्हाद जाधव ,श्रीकृष्ण वारूंगसे ,डॉ .श्रीराम लहामटे ,आदि दिसत आहे. (फोटो : आयटीपीएचला ०६ इगतपूरी नावाने सेव्ह आहे. )