बाबासाहेब
By admin | Published: April 13, 2016 12:57 AM
बाबा आमचा श्वासच
बाबा आमचा श्वासचजगण्याच्या कैदेत धपधपत होताकालपर्यंत आमची नजर जमिनीवर चिकटलेलीकापरासारखं भुर्र भुर्र जळणारं मनभुकेची आठवण आली तऱ़़ओलं कापड करकचून पोटाला बांधायचोपिढीजात अर्शूवर्षात भिजायचो़गावकुसाबाहेरील झिडकारलेलंआमचं लाचार जीण़ंज्वालामुखीलाच गिळावाअसा तेजोमय प्रकाशबाबा तुमच्या रूपाने राजवाड्याच्या वस्तीत आला़शील, करुणा, विद्या, समता, न्याय, बंधुतायाची शिकवण आम्ही समाजाची पाटीघेऊन गिरवू लागलो़संविधानाने आमचं जगणं उजळलंउदात्त, उन्नत दृष्टिकोन ठेवून तुम्ही आम्हाला माणूस केलंतआजही आम्ही नित्यनियमानेतुमच्या पुतळ्याला स्वाभिमानानेनतमस्तक होऊन हात जोडतो़- मारुती कटकधोंडक-429, राजस्व नगर,विजापूर रोड, सोलापूरसंवाद - 9881124450