भारताची महिला स्टार रेसलर बबिता फोगटच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. बबिता फोगटनं एका गोंडस मुलाला जन्म दिला. यानंतर तिनं स्वत: सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही गोड बातमी सर्वांना दिली. यापूर्वी सोमवारी दुपारी अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या घरीही चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं. विराट कोहलीनंसोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती दिली होती. बबित फोगटनं आपल्या पतीसह मुलाचा फोटो शेअर केला आहे. "आमच्या SONshine ला भेटा. स्वप्नांवर विश्वास ठेवा. ती पूर्ण होतात. आमची स्वप्न या निळ्या कपड्यांमध्ये असलेल्यामुळे पूर्ण झाली," असा भावूक संदेशही तिनं आपल्या फोटोसोबत लिहिला आहे. २०१४ मध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या बबिता फोगटनं डिसेंबर २०१८ मध्ये विवेक सुहाग याच्यासह विवाह केला होता.
बबिता फोगट झाली आई, फोटो शेअर करत म्हणाली मीट अवर लिटिल 'सन'शाईन
By जयदीप दाभोळकर | Updated: January 11, 2021 18:25 IST
फोटो शेअर करत दिली माहिती, पाहा चिमुकल्या पाहुण्याचा फोटो
बबिता फोगट झाली आई, फोटो शेअर करत म्हणाली मीट अवर लिटिल 'सन'शाईन
ठळक मुद्देफोटो शेअर करत बबितानं दिली माहितीयापूर्वी विरुष्काच्या घरीही झालं चिमुकलीचं आगमन