नवी दिल्ली: बाबरी मशीद प्रकरणातील सगळेच आरोपी निर्दोष आहेत. मग बाबरी मशीद कोणी तोडली. ती जादूनं पडली का?, असा सवाल एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. देशाच्या एकतेवर आणि अखंडतेवर विश्वास असणाऱ्यांसाठी आज काळा दिवस आहे. हिंसाचार केल्यास न्याय मिळतो, असा संदेश आज देण्यात आला, अशा शब्दांत ओवेसींनी न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.लखनऊमधील सीबीआयच्या विशेष न्यायालयानं बाबरी मशीद प्रकरणातील ३२ आरोपींची आज सुटका केली. ही घटना पूर्वनियोजित नव्हती. तर ती अचानक घडल्याचं न्यायालयानं निकाल देताना म्हटलं. न्यायालयाच्या निकालावर ओवेसींनी अनेक प्रश्न उपस्थित केले. 'कोणीच दोषी नसेल तर मग बाबरी मशीद जादूनं पडली का? मशिदीत जादूनं मूर्ती ठेवण्यात आल्या का? मशिदीचं कुलूप जादूनं उघडण्यात आलं का?,' असे सवाल त्यांनी विचारले.
Babri Masjid Case: सगळेच निर्दोष असतील, तर मग बाबरी मशीद जादूनं पडली का?; ओवेसींचा सवाल
By कुणाल गवाणकर | Published: September 30, 2020 3:12 PM