लखनऊ: बाबरी मशीद प्रकरणात सीबीआय विशेष न्यायालयानं सर्व ३२ आरोपींची सुटका केली आहे. वादग्रस्त ढाचा पाडल्याची घटना पूर्वनियोजित नव्हती. ती अचानक घडली, असं न्यायालयानं निकाल देताना म्हटलं. सीबीआयकडून करण्यात आलेले अनेक युक्तिवाद न्यायालयानं फेटाळून लावले आणि २८ वर्षांपासून सुरू असलेल्या बाबरी मशीद खटल्यात निकाल दिला.भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह एकूण ३२ जण या खटल्यात आरोपी होते. न्यायालयानं निर्दोष मुक्तता केल्यावर आडवाणींनी आनंद व्यक्त केला. 'सीबीआयच्या विशेष न्यायालयानं दिलेल्या निकालाचं मी मनापासून स्वागत करतो. राम मंदिरासाठी उभारण्यात आलेल्या लढ्यात मी आणि भाजपनं स्वत:ला झोकून दिलं होतं. हा निर्णय राम मंदिराबद्दलच्या आमच्या वचनबद्धतेवर शिक्कामोर्तब करणारा आहे,' असं आडवाणी म्हणाले.
Babri Masjid Case: बाबरी मशीद प्रकरणातून सर्व आरोपींची सुटका; आडवाणी म्हणाले...
By कुणाल गवाणकर | Published: September 30, 2020 1:59 PM