बाबुर्डी ग्रामपंचायत कर्मचार्यांचा पगार थकीत
By admin | Published: October 30, 2016 10:46 PM
सात महिन्यांपासून प्रतीक्षा : दिवाळी अंधारात
सात महिन्यांपासून प्रतीक्षा : दिवाळी अंधारातसुपे : बाबुर्डी (ता. बारामती) ग्रामपंचायतीच्या कर्मचार्यांना मागील सात महिन्यांपासून पगार मिळाला नसल्याने दिवाळी सणापासून वंचित राहिले आहेत. आमच्या मुला-बाळांना काही गोडधोड खाऊ घालण्यासाठी त्वरित पगार मिळावा, अशी मागणी कर्मचार्यांनी केली आहे. येथील ग्रामपंचायत कर्मचार्यांचे मागील सात महिन्यांपासून पगार रखडलेले आहेत. त्यामुळे त्यांची चूल बंद झाली आहे. या दिवाळीला पगार होईल, या आशेवर येथील कर्मचारी होते. मात्र, ऐन दिवाळीतही पगार झाला नसल्याने मुला-बाळांना काय खायला घालायचे, अशी वेळ येथील कर्मचार्यांवर आली आहे. यासंदर्भात पंचायत समितीनेे लक्ष घालून आमचा पगार मिळवून द्यावा, अशी मागणी येथील कर्मचार्यांनी केली आहे. याबाबत सरपंच सुजाता गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, की येथील घरपी व पाणीपी थकीत आहे. त्यामुळे कर्मचार्यांचे पगार करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या खात्यावर रक्कम नाही. दिवाळीसाठी माझे स्वत:चे २० हजार रुपये पगारासाठी दिले होते. मात्र या कर्मचार्यांनी पुन्हा पैसे घरी आणून दिल्याची माहिती सरपंच गायकवाड यांनी दिली. -----------------------