बरेली - लहान मुलांची अत्यंत काळजी घेणं गरजेचं असतं. चिमुकल्यांना खेळत असताना अनेक गोष्टी तोंडात घालण्याची सवय असते. मात्र अनेकदा मुलं पालकांची नजर चुकवून नको त्या वस्तू तोंडात घालत असतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. खेळता खेळता एक वर्षाच्या चिमुकल्याने चक्क सापाचं पिल्लू गिळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील भोलापूर गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मात्र सुदैवाने चिमुकल्याच्या आईच्या लक्षात ही गोष्ट वेळीच आल्याने तिने पटकन मुलाच्या तोंडातून साप बाहेर काढला. तसेच तातडीने मुलाला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मुलाने सापाचं पिल्लू गिळल्याचं समजताच डॉक्टरांनाही धक्काच बसला. त्यांनी तातडीने मुलांवर उपचार सुरू केले.
मुलगा खेळत असताना त्याने सापाचं पिल्लू गिळलं असल्याची माहिती मिळत आहे. डॉक्टरांनीही मुलावर उपचार करुन त्याला इंजेक्शन दिलं आहे. सध्या चिमुकल्याची प्रकृती स्थिर असून त्याला कोणताही धोका नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तसेच उपचारानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे माहिती दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : कोरोनाचा धोका वाढला; धडकी भरवणाऱ्या आकडेवारीने रेकॉर्ड मोडला
बापरे! रेल्वे स्थानकाजवळ भीषण स्फोट, 35 फूट उंच उडाले दगड; थरकाप उडवणारा Video
"अभिनंदन इंडिया", मुलाच्या अटकेनंतर रिया चक्रवर्तीच्या वडिलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...