मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वाद अखेर संपुष्टात आला आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रलयाच्या सूचनेनंतर राज्य सरकारने भाषणाची सक्ती मागे घेतल्याने मुख्याध्यापक आणि शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. अनेक शाळांमध्ये भाषण दाखविण्यासाठी यंत्रणाच नसल्याने या भाषणाचे पुन:प्रक्षेपण दाखविण्याचा निर्णय शाळांनी घेतला आहे.
शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधानांचे भाषण होणार असून, त्याचे प्रक्षेपण टीव्ही, इंटरनेट, रेडिओ इत्यादीमार्फत सर्व शाळांमधील विद्याथ्र्यार्पयत पोहोचविण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्यांना दिले आहेत. 5 सप्टेंबर रोजी दुपारी 3 ते 4.45 या वेळेत पंतप्रधानांचे भाषण होणार असल्याने या वेळी विद्याथ्र्याना टीव्ही संचासमोर बसविण्यात यावे, असे आदेश दिले आहेत.
या आदेशाला सर्व स्तरातून तीव्र विरोध झाल्यानंतर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रलयाने भाषणाची
सक्ती नसल्याचे जाहीर केले. त्यानुसार शालेय शिक्षण सचिव अश्विनी
भिडे यांनी मुख्याध्यापक संघटनेच्या पदाधिका:यांना एसएमएसद्वारे पंतप्रधानांचे भाषण दाखविणो
सक्तीचे नसल्याचे स्पष्ट केले
आहे.
शाळांच्या सकाळच्या सत्रतील विद्याथ्र्याना पंतप्रधानांचे भाषण ऐकता येणार नसल्याने या भाषणाचे पुन:प्रक्षेपण 10 तारखेर्पयत दाखविण्याचा निर्णय मुख्याध्यापकांनी घेतला आहे. तसेच बहुतांश शाळांमध्ये टीव्ही संच नसल्याने विद्याथ्र्यानी घरीच टीव्हीवर भाषण ऐकावे, अशा सूचनाही शाळांनी विद्याथ्र्याना दिल्या आहेत.
राष्ट्रपती आणि शिक्षणमंत्री यांचा लेखी संवाद शिक्षण दिनी विद्याथ्र्यार्पयत पोहोचविण्यात येईल. परंतु पंतप्रधानांचे भाषण दाखविण्यासाठी शाळांकडे सुविधा उपलब्ध नसल्याने या भाषणाचे पुन:प्रक्षेपण शाळांमध्ये दाखविण्यात येईल. यंदा आम्ही पंतप्रधानांच्या भाषणाचे स्वागत केले आहे.
परंतु त्यांच्या भाषणाची चिकित्सा केल्यानंतरच पुढील वर्षी भाषणाबाबतची आमची भूमिका स्पष्ट केली जाईल, असे महाराष्ट्र मुख्याध्यापक संघ महामंडळाचे
प्रवक्ते प्रशांत रेडीज यांनी
सांगितले. (प्रतिनिधी)