नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने गुजरातचे बडतर्फ आयपीएस अधिकारी संजीव भट यांची त्यांच्याविरुद्ध दाखल दोन गुन्ह्यांचा तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) करण्याची मागणी करणारी याचिका मंगळवारी फेटाळली. सोबतच भट यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या दोन खटल्यांवरील स्थगितीही उठविली. या एफआयआरमध्ये भट यांच्यावर २००२ च्या गुजरात दंगलींशी संबंधित प्रकरणात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याकरिता आपल्या कनिष्ठ सहकाऱ्यावर दबाव आणणे आणि एक कायदा अधिकाऱ्याचा ई-मेल हॅक केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. यापूर्वी भट यांनी या दोन्ही गुन्ह्यांची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशीची मागणी केली होती; परंतु नंतर ज्या लोकांविरुद्ध आपली तक्रार आहे ते आता केंद्रात सरकारमध्ये असल्याचे सांगून एसआयटीद्वारे न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची विनंती त्यांनी केली.
बडतर्फ आयपीएस अधिकाऱ्याची याचिका फेटाळली
By admin | Published: October 14, 2015 1:00 AM