बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री एका वक्तव्यामुळे विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. त्याचा एक व्हिडिओ आज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात ते प्रवचन देताना म्हणत आहेत, 'एखादी महिला विवाहित असेल, तर तिच्या दोन ओळखी असतात, भांगेत कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र. मात्र, भांगेत कुंकू नसेल आणि गळ्यात मंगळसूत्र नसेल, तर आम्ही लोक काय समजतो, की हा प्लॉट अजून रिकामा आहे.'
धीरेंद्र शास्त्री यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडिया यूजर्सनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी बाबांच्या या व्हिडीओसह ट्विटरवर लिहिले की, असे बोलणारे ना संत असू शकतात ना कथाकार. एवढेच नाही, तर बाबांच्या या वक्तव्यावर अनेक महिलांनीही संताप व्यक्त केला आहे.
या व्हिडिओमध्ये बागेश्वर बाबा पुढे म्हणतात, 'आणि भांगेत कुंकू असेल, गळ्यात मंगळसूत्र असेल, तर आम्ही लोक दूरूनच पाहून समजून घेतो की, रडिस्ट्री झाली आहे.' महत्वाचे म्हणजे, या व्हिडिओत दिसत आहे की, प्रवचन ऐकणाऱ्या अनेक महिला टाळ्या वाजवत हसत आहेत. मात्र सोशल मीडियावर काही महिला यावर संताप व्यक्त करत आहेत.
यासंदर्भात सूजाता नावाच्या एका ट्विटर युजरने प्रतिक्रिया देत लिहिले, कोण कोणते प्लॉट रिकामे आहेत, आम्हालाही जाणून घ्यायचे आहे. तुम्हीही घाला मंळळसूत्र आणि भांगही भरा. चोराला बाबा बनवले आहे. आम्ही महिला कोणत्या समाजात राहतो, लाज वाटते. खरोखरच दुर्दैवी.
निगर परवीन या ट्विटर यूजरने म्हटले आहे, "बाबा म्हणतायत, ज्या महिलेच्या भांगेत कुंकू नाही आणि गळ्यात मंगळसूत्र नाही, त्यांना लोक समजतात 'अजून प्लाट रिकामा आहे.' विचार करा असा विचार आहे. यांच्या दरबारात चिठ्ठी खुली केल्यानंतर, पत्रकार जय-जयकार करतात. पोलीस अधिकारी वर्दीवर त्यांच्या पायात पडतात. शासन-प्रशासन केवळ मुलांसाठीच नसते."
याशिवाय अनेकांनी धिरेंद्र शास्त्री यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे.