Dhirendra Krishna Shastri : गेल्या काही दिवसांपासून देसभरात चर्चा सुरू असलेल्या मध्य प्रदेशातील बागेश्वर धाम येथील पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा भाऊ शालिग्राम याला अटक करण्यात आली आहे. एका लग्न समारंभात दलित कुटुंबाला धमकावल्याचा आरोप शालिग्रामवर आहे. छतरपूर पोलिसांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या भावाला जिल्हा न्यायालयात हजर केले. न्यायालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गेल्या महिन्यात पोलिसांनी त्याच्यावर एसटी-एससी कायद्यांतर्गत गुन्हाही दाखल केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात गडा गावातील एका अहिरवार कुटुंबातील मुलीचा विवाह होता, या कुटुंबाला बागेश्वर धाम येथे आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात मुलीचे लग्न करायचे होते आणि त्यासाठी अर्जही केला होता, मात्र नंतर निर्णय बदलला.
शालिग्रामला हे न आवडल्याने त्याने लग्न समारंभात पोहोचून गोंधळ घातला आणि धमकी दिली. शालिग्रामचा दलित कुटुंबीयांना धमकावल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर पोलिसांनी शालिग्रामविरुद्ध एससी-एससी कायद्यांतर्गत विविध कलमांसह गुन्हा दाखल केला आहे. गारहा गावातील एका व्यक्तीने सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटोसह एक पोस्ट लिहिली होती, ज्यामध्ये धीरेंद्र शास्त्री यांचा भाऊ शालिग्राम दिसत होता. त्याच्या हातात बंदूकही दिसत होती.
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा भाऊ शालिग्राम गर्ग याला अटक करण्यासाठी छतरपूर पोलिसांवर खूप दबाव होता. शालिग्रामच्या अटकेच्या मागणीसाठी दलित संघटना सातत्याने निदर्शने करत होत्या. दरम्यान, धीरेंद्र कृष्ण शास्त्री आपल्या भावापासून दुरावले आहेत. या प्रकरणात आपले नाव ओढण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.