नवी दिल्ली: बागेश्वर धाम येथील मठाधिपती धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) उर्फ बागेश्वर महाराज (Bageshwar Maharaj) गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. लोकांच्या मनात काय सुरु आहे, हे ते ओळखत असल्याचा दावा करतात. त्यांना लोकांच्या समस्या न सांगताच समजतात. त्या समस्यांचे उत्तर ते कागदावर लिहून देतात. त्यामुळे त्यांचा दरबारात देशभरातून अनेक जण येत आहेत. बागेश्वर महाराज यांच्या दाव्यावर मोठी चर्चा सध्या सुरु आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून बागेश्वर महाराजांच्या लग्नाबाबतही चर्चा रंगू लागली आहे. याचदरम्यान आपण लवकरच लग्न करणार असल्याची माहिती बागेश्वर महाराज यांनी दिली आहे.
मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धाम येथे सोमवार-मंगळवारच्या मध्यरात्री धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजेच बागेश्वर महाराज यांचा दरबार झाला. प्रदीर्घ कालावधीनंतर धामवर पोहोचलेल्या बागेश्वर महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. बागेश्वर महाराज हजारोंच्या गर्दीतून बाहेर आले आणि मध्यरात्री त्यांना भेटले. तसेच एका हिंदी वृत्तवाहिनीशी त्यांनी संवाद साधला. बागेश्वर धाममध्ये १२१ गरीब मुलींचे सामूहिक विवाह होत आहेत. सामूहिक विवाहाचे हे चौथे वर्ष आहे. बागेश्वर महाराज यांनी सांगितले की, या सामूहिक विवाहात नवीन जोडप्यांना कार आणि बाईक वगळता घरातील सर्व सामान दिले जाईल. म्हणजेच टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन, कुलर, सोफा आणि डबल बेड सादर केले जाणार असल्याचं त्यांनी सांगितले.
बागेश्वर महाराजांसारखं तिलाही येतं, पहिलीपर्यंतचं शिकली अन्...; जाणून घ्या, सुहानी शाहबद्दल!
बागेश्वर महाराजांना त्यांच्या लग्नाबाबत विचारले असता सध्या माझ्या लग्नाची चर्चा सुरू आहे. मी कोणी साधू-संत नाही, अगदी सामान्य माणूस आहे. आपल्या ऋषीमुनींच्या परंपरेतही अनेक महापुरुषांनी घराघरात जीवन व्यतीत केले आहे. देवही गृहस्थांमध्येच दिसतो. म्हणजे आधी ब्रह्मचारी, मग गृहस्थ, वनप्रस्थ आणि नंतर संन्यासाची परंपरा आहे, त्यावर आपण पुढे जाऊ. आम्हीही लवकरच लग्न करणार आहोत. आम्ही सर्वांना आमंत्रित करू, परंतु अधिक लोकांना आमंत्रित करू शकत नाही. मात्र आम्ही प्रत्येकासाठी लग्नाचे थेट प्रक्षेपण करू, अशी माहिती बागेश्वर महाराजांनी दिली.
नेमका वाद काय?
दिव्यशक्तीचा दावा करणाऱ्या धीरेंद्र महाराजांना श्याम मानव यांनी आव्हान दिलं होतं. अंनिसने धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना त्यांच्याकडे असणारी दैवीशक्ती सर्वांसमोर दाखवा असं जाहीर आव्हान दिलं होतं. त्यावेळी धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे कार्यक्रम अर्ध्यातच सोडून निघून गेले होते. त्यामुळं या प्रकरणाची खूप चर्चा रंगली होती.
कोण आहेत बागेश्वर महाराज?
बागेश्वर महाराजांचं मूळ नाव धीरेंद्र रामकृपाल गर्ग. त्यांचा जन्म १९९६ साली त्यांचा झाला. मध्य प्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्यातल्या गढा गावात जन्म झाला. त्यांच्या वडिलांचं नाव रामकृपाल गर्ग आणि आईचं नाव सरोज गर्ग. तीन भावंडांमध्ये धीरेंद्र हे सर्वात मोठे आहेत. त्यांचं बालपण अत्यंत गरिबीत गेलं. धीरेंद्र यांचं शिक्षण केवळ बारावीपर्यंत झालं आहे. हे त्यांच्या दिव्य दरबारामध्ये सनातन धर्माचा पुरस्कार करत हिंदूंच्या संरक्षणासाठी सनातन धर्म टिकणे महत्त्वाचे असल्याचे सांगतात.