बागेश्वर धाम येथील मठाधिपती धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) उर्फ बागेश्वर महाराज (Bageshwar Maharaj) गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. लोकांच्या मनात काय सुरु आहे, हे ते ओळखत असल्याचा दावा करतात. त्यांना लोकांच्या समस्या न सांगताच समजतात. त्या समस्यांचे उत्तर ते कागदावर लिहून देतात. त्यामुळे त्यांचा दरबारात देशभरातून अनेक जण येत आहेत. बागेश्वर महाराज यांच्या दाव्यावर मोठी चर्चा सध्या सुरु आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून बागेश्वर महाराजांच्या लग्नाबाबतही चर्चा रंगू लागली आहे. मात्र याचदरम्यान त्यांच्या एका कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बागेश्वर धाम येथे पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या बागेश्वर धाममध्ये १३ फेब्रुवारी रोजी सामूहिक विवाहाचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या बागेश्वर महाराज गरीब असलेल्या १२१ बहिणींच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत. लग्नाचा संपूर्ण खर्च ते उचलत आहे. या लग्नासाठी त्यांनी देशातील अनेक मोठ्या संतांना आमंत्रित केले आहे. एकेकाळी स्वत:च्या बहिणीचे लग्न लावण्यासाठी धीरेंद्र शास्त्री यांच्याकडे पैसे नव्हते. ते आज समाजातील गरीब मुलींचे लग्न लावून देत आहेत. धीरेंद्र शास्त्री यांच्या याच कृतीने सर्वंजण त्यांचे कौतुक करत आहेत.
बागेश्वर महाराजांसारखं तिलाही येतं, पहिलीपर्यंतचं शिकली अन्...; जाणून घ्या, सुहानी शाहबद्दल!
एक काळ असा होता की, पंडित धीरेंद्र शास्त्री आर्थिक संकटाचा सामना करत होते. त्याचवेळी त्याच्या बहिणीचे लग्न जवळ आले होते. पैशाची नितांत गरज होती. त्यानंतर त्याचा एक जवळचा मुस्लिम मित्र शेख मुबारक याने त्यांना सुमारे २५ हजार रुपयांची मदत केली होती. शेख मुबारक म्हणाले की, त्यांनी नंतर पैसे मला परत केले होते. तेव्हापासून त्यांनी ठरवले होते की, जेव्हा कधी त्यांच्या आयुष्यात संपन्नता येईल, तेव्हा गरीब मुलींचे लग्न लावून देईल. पंडित धीरेंद्र शास्त्री यांना गरिबीत मुलीचे-बहिणीचे लग्न लावताना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते, याची त्यांना जाणीव आहे. यामुळेच ते नेहमी गरीब मुलींचे लग्न लावून देण्याचा आग्रह धरतात.
बागेश्वर धाममध्ये १२१ मुलींचे लग्न
पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली बागेश्वर धाममध्ये १२१ मुलींच्या लग्नाची तयारी सुरू आहे. याबाबत पंडित धीरेंद्र शास्त्री खूप उत्सुक आहेत. यासोबतच जिल्ह्यातील त्यांचे सर्व भक्त व सेवक मुलींच्या लग्नात मदत करत आहेत. भाविक घरोघरी जाऊन पिवळे तांदूळ देऊन लग्नाचे आमंत्रण देत आहेत.
कोण आहेत बागेश्वर महाराज?
बागेश्वर महाराजांचं मूळ नाव धीरेंद्र रामकृपाल गर्ग. त्यांचा जन्म १९९६ साली त्यांचा झाला. मध्य प्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्यातल्या गढा गावात जन्म झाला. त्यांच्या वडिलांचं नाव रामकृपाल गर्ग आणि आईचं नाव सरोज गर्ग. तीन भावंडांमध्ये धीरेंद्र हे सर्वात मोठे आहेत. त्यांचं बालपण अत्यंत गरिबीत गेलं. धीरेंद्र यांचं शिक्षण केवळ बारावीपर्यंत झालं आहे. हे त्यांच्या दिव्य दरबारामध्ये सनातन धर्माचा पुरस्कार करत हिंदूंच्या संरक्षणासाठी सनातन धर्म टिकणे महत्त्वाचे असल्याचे सांगतात.